Save thousands on Ola's Ola S1 Pro electric scooter; Read in detail | Loksatta

Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत!

खुशखबर! इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे बंपर डिस्काउंट.

Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत!
OLA Electric-Scooterची डिसेंबर २०२२ मध्ये बंपर विक्री. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

देशात पेट्रोल आणि डिझलचे दर गगनाला भिडले असल्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे दिसत आहे. यातच आता आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या विविध क्लृप्त्या, ऑफर देत आहेत. देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक ओला इलेक्ट्रिकने ही आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफरची घोषणा केली आहे. या आॅफरचा फायदा घेत तुम्हाला स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार आहे. ही भन्नाट ऑफर तुम्हाला कंपनीच्या Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे.

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर ‘अशी’ आहे ऑफर

ओलाने ऑफर केलेल्या ‘डिसेंबर टू रिमेंबर’ ऑफरसह, बक्षिसे मिळण्याच्या मार्गावर आहेत. Ola ने कंपनीच्या चालू असलेल्या रेफरल प्रोग्रामचा भाग म्हणून दहा मोफत S1 Pro स्कूटर देण्याची घोषणा देखील केली आहे, ज्यातील विजेते रॅफल स्पर्धेद्वारे ठरवले जातील. सहभागी होण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या जवळच्या ओला अनुभव केंद्रांना भेट द्यावी लागेल आणि स्कूटरची चाचणी घ्यावी लागेल.

(आणखी वाचा : केवळ ६ हजारात घरी न्या ‘ही’ होंडाची शानदार स्कूटर; जाणून घ्या फायनान्स प्लॅन)

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षाच्या सुरुवातीला ९९ हजार ९९९ रुपये किमतीत सादर करण्यात आली होती. Ola च्या विशेष ऑफर अंतर्गत, ही स्कूटर शून्य डाउन पेमेंट आणि कमी मासिक ईएमआयवर फक्त २,४९९ रुपयांसह ८.९९ टक्के पासून कमी व्याजदराने ऑफर केली जात आहे. त्याच वेळी, ग्राहक निवडक क्रेडिट कार्डांवर शून्य प्रक्रिया शुल्क आणि अतिरिक्त सवलत देखील घेऊ शकतात.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 20:56 IST
Next Story
केवळ ६ हजारात घरी न्या ‘ही’ होंडाची शानदार स्कूटर; जाणून घ्या फायनान्स प्लॅन