क्रूझर बाईक सेगमेंट हा बाइक क्षेत्रातील लोकप्रिय सेगमेंट आहे, जी लांब प्रवास आणि साहसाची आवड असलेल्या लोकांना आवडते. या सेगमेंटमध्ये एन्ट्री लेव्हलपासून प्रीमियम हाय रेंजपर्यंतच्या बाइक्स आहेत.

या सध्याच्या रेंजमध्ये आपण ज्या बाईकबद्दल बोलत आहोत ती म्हणजे बजाज अॅव्हेंजर 220 जी त्याच्या डिझाइनसाठी चांगलीच पसंत केली जाते. जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी केली तर तुम्हाला यासाठी १.३८ लाख रुपये खर्च करावे लागतील.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
Upvas special naivedya special batata bhaji
बटाटयांची सुकी भाजी; नैवेद्याच्या पानावर वाढली जाणारी बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करा
police women struggles to meet her baby child for just 2 minute
VIDEO : शेवटी आईचं काळीज! फक्त २ मिनिटे लेकीला भेटण्यासाठी हिरकणीची धडपड; पोलीस कर्मचारीचा व्हिडीओ व्हायरल

पण जर तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल, पण ही बाईक घ्यायची असेल तर या बाईकवर उपलब्ध असलेल्या आकर्षक ऑफर्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या. या ऑफर वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती देत आहोत.

बजाज अॅव्हेंजर 220 वरील पहिली ऑफर OLX वेबसाइटवरून आली आहे जिथे बाइकचे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत १८,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या बाईकवर कोणतीही ऑफर किंवा प्लॅन येथे उपलब्ध असणार नाहीत.

आणखी वाचा : धमाकेदार ऑफर! केवळ ७० हजारांमध्ये मिळतेय Maruti Alto, जाणून घ्या सविस्तर

दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या बाईकचे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. इथे त्याची किंमत २७,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला एक फायनान्स प्लॅन मिळेल.

तिसरी ऑफर CREDR वेबसाइटवर दिली आहे. इथे या क्रूझर बाईकचे २०१५ चे मॉडेल पोस्ट केले आहे. या बाईकची किंमत येथे ३१,३६० रुपये ठेवण्यात आली आहे. हे खरेदी करताना तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा योजना मिळणार नाही.

आणखी वाचा : Hero Splendor पेक्षा कमी किंमतीत मिळतेय Maruti WagonR, जाणून घ्या काय आहे ऑफर?

बजाज अॅव्हेंजर 220 वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याच्या इंजिनपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घ्या.

Bajaj Avenger 220 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात सिंगल सिलेंडरसह 220 cc इंजिन आहे. हे इंजिन १९.०३ PS पॉवर आणि १७.५५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही बजाज एव्हेंजर २२० क्रूझर बाईक ४५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.