मोठी मायलेज असलेली Hero HF Deluxe अवघ्या २२ ते २४ हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर

आम्ही Hero HF Deluxe बद्दल बोलत आहोत, जी कमी किमतीत मोठी मायलेज देणारी बाइक आहे. तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल तर अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याच्या ऑफर्सची संपूर्ण माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

Hero-HF-Deluxe-12
(फोटो- DROOM)

दुचाकी क्षेत्रात ज्या बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे, त्यामध्ये सर्वाधिक मायलेज असलेल्या बाइक्स कमी बजेटमध्ये सहज उपलब्ध आहेत. या मायलेज बाइक्सच्या मोठ्या रेंजमध्ये, आम्ही Hero HF Deluxe बद्दल बोलत आहोत, जी कमी किमतीत मोठी मायलेज देणारी बाइक आहे.

Hero HF Deluxe बाईक कंपनीने ५६,०७० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात आणली आहे, जी टॉप व्हेरिएंटमध्ये जाताना ६४,५२० रुपयांपर्यंत जाते. तुम्हाला ही बाईक विकत घ्यायची असेल तर अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याच्या ऑफर्सची संपूर्ण माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

Hero HF Deluxe वर आलेल्या ऑफर वेगवेगळ्या वेबसाइट्सवर दिल्या आहेत. त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती सांगत आहोत जेणेकरून तुम्ही कमीत कमी किमतीत चांगली बाइक खरेदी करू शकता.

पहिली ऑफर DROOM वेबसाइटवर दिली आहे जिथे या Hero HF Deluxe चे 2019 मॉडेल लीस्ट केले गेले आहे. येथे त्याची किंमत २२,५०० रुपये ठेवण्यात आली आहे, जी खरेदी केल्यावर तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळू शकतो.

दुसरी ऑफर QUIKR वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथे त्याचे २०२० चे मॉडेल लीस्ट आहे. इथे या बाईकची किंमत २२,००० रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु त्यासोबत कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.

तिसरी ऑफर OLX वेबसाइटवर दिली आहे जिथे Hero HF Deluxe चे २०२० मॉडेल लीस्ट केले गेले आहे आणि या बाईकची किंमत २४,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आणखी वाचा : Hero MotoCorp ने लॉंच केली नवी स्प्लेंडर मोटारसायकल, किंमत फक्त ७२,९०० रुपये, जाणून घ्या

Hero HF Deluxe वर नमूद केलेल्या ऑफरचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला ती खरेदी करायची असेल, तर तुम्ही या बाईकचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घेऊ शकता.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 97.2 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही Hero HF Deluxe 83 kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand hero hf deluxe from 22 to 24 thousand read offers and full details of bike prp

Next Story
Hero MotoCorp ने लॉंच केली नवी स्प्लेंडर मोटारसायकल, किंमत फक्त ७२,९०० रुपये, जाणून घ्या
फोटो गॅलरी