देशातील टू व्हीलर सेक्टरमध्ये १०० सीसी इंजिन असलेल्या बाईक्सनंतर १२५ सीसी इंजिन असलेल्या बाईकची मागणी खूप जास्त आहे. मजबूत इंजिनसह या बाईक्सना चांगले मायलेज आणि आकर्षक डिझाईन मिळते. या १२५ सीसी सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या बाईक्सपैकी आम्ही Hero Super Splendor बद्दल बोलत आहोत जी तिच्या कंपनीच्या लोकप्रिय बाईक्समध्ये गणली जाते. ही बाईक तिच्या किंमती आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.

जर तुम्ही हिरो सुपर स्प्लेंडर खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये गेलात तर यासाठी तुम्हाला ७७,५०० ते ८१,४०० रुपये खर्च करावे लागतील. पण जर तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल तर येथे जाणून घ्या त्या ऑफर्सची माहिती, ज्यामध्ये तुम्ही ही बाईक केवळ २५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी घेऊन जाऊ शकाल.

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

आणखी वाचा : Kia Sonet X Line दोन व्हेरिएंटसह भारतात झाली लॉंच, जाणून घ्या SUV ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Hero Super Splendor वरील ऑफर वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून घेण्यात आल्या आहेत ज्यांची खरेदी, विक्री आणि सेकंड हँड वाहनांची लिस्टींग करण्यात येत असते. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला निवडक ऑफर्सची माहिती सांगत आहोत.

पहिली ऑफर OLX वेबसाइटवर दिली आहे. येथे Hero Super Splendor चे २०१२ चे मॉडेल लीस्ट केले आहे आणि त्याची किंमत १५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक विकत घेतल्यावर तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा कर्ज मिळणार नाही.

आणखी वाचा : केवळ ३० हजारात मिळतेय Bajaj Pulsar NS200, वाचा ऑफर

दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवर आली आहे जिथे Hero Super Splendor चे २०१४ चे मॉडेल लीस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत १७,५०० रुपये आहे. या बाईकसह तुम्ही फायनान्स प्लॅन मिळवू शकता.

तिसरी ऑफर BIKE4SALE वेबसाइटवरून घेतली आहे आणि येथे Hero Super Splendor चे २०१५ चे मॉडेल लीस्ट केले आहे. या बाईकची किंमत २० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या बाईकवर कोणत्याही प्रकारची ऑफर किंवा फायनान्स प्लॅन दिला जाणार नाही.

आणखी वाचा : Bike Mileage Increase Tips: बाईकच्या मायलेजची चिंता वाटतेय? मग या ५ टिप्स समस्या दूर करतील

Hero Super Splendor वरील या ऑफर्सची संपूर्ण माहिती वाचल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घ्या सविस्तर…

Hero Super Splendor मध्ये कंपनीने १२४.७ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन १०.८ PS पॉवर आणि १०.६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

बाइकच्या मायलेजबद्दल, Hero MotoCorp दावा करते की ही Hero Super Splendor बाईक ८३ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.