२५ ते ३५ हजारांच्या बजेटमध्ये मिळतेय ही 'स्कूटर' | second hand honda activa 125 from 25 to 34 thousand with finance plan read offer details prp 93 | Loksatta

२५ ते ३५ हजारांच्या बजेटमध्ये मिळतेय ही ‘स्कूटर’

टू व्हीलर सेक्टरमधील स्कूटर सेगमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार स्कूटर मिळतात, ज्यामध्ये १०० सीसी ते १२५ सीसी स्कूटर उपलब्ध आहेत.

Honda-Activa-125
(सांकेतिक फोटो-HONDA)

टू व्हीलर सेक्टरमधील स्कूटर सेगमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार स्कूटर मिळतात, ज्यामध्ये १०० सीसी ते १२५ सीसी स्कूटर उपलब्ध आहेत.
ज्यामध्ये आम्ही Honda Activa 125 बद्दल बोलत आहोत जी तिच्या कंपनीसोबत या सेगमेंटची एक लोकप्रिय स्कूटर आहे.

Honda Activa 125 ची सुरुवातीची किंमत ७४,१५७ आहे जी टॉप व्हेरिएंटमध्ये ८२,२८० पर्यंत जाते.

तुम्हाला ही स्कूटर आवडत असल्यास, तुम्ही आकर्षक प्लानसह अतिशय कमी किंमतीत ही Honda Activa खरेदी करण्याचे संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घेऊ शकता.

Honda Activa 125 वरील या ऑफर ऑनलाइन सेकंड हँड दुचाकी खरेदी आणि विक्रीची माहिती देणाऱ्या वेबसाइटवरून घेतल्या आहेत ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफरबद्दल माहिती देऊ.

या Honda Activa 125 चे २०१६ मॉडेल BIKEDEKHO वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले असून त्याची किंमत ३४,००० रुपये ठेवण्यात आली आहे.

आणखी वाचा : Royal Enfield Scram 411 लॉन्चिंग डेट जाहीर, जाणून घ्या किती दमदार असेल ही बाईक?

Honda Activa 125 चे २०१४ मॉडेल DROOM वेबसाइटवर २९,०५८ रुपयांच्या किंमतीला फायनान्स ऑफरसह विक्रीसाठी सूचीबद्ध केले आहे.

BIKES4SALE वेबसाइटने Honda Activa 125 चे २०१६ मॉडेल २५,००० रुपयांच्या विक्रीसाठी सूचीबद्ध केले आहे.

Honda Activa 125 वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला ती खरेदी करायची असेल, तर या स्कूटरच्या इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

स्कूटरमध्ये सिंगल सिलेंडर १२४ सीसी इंजिन आहे जे ८.२९ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

आणखी वाचा : Maruti Dzire CNG लवकरच होणार लॉंच; किंमत, फिचर्स आणि मायलेजपर्यंत संपूर्ण डिटेल्स वाचा

या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही Honda Activa 125 स्कूटर ६० kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

येथे नमूद केलेल्या ऑफरचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही तुमचे बजेट, प्राधान्य आणि गरजेनुसार तीनपैकी कोणतेही पर्याय खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2022 at 23:34 IST
Next Story
लक्झरीमध्ये नंबर १ असलेली BMW कंपनीने X4 SUV ही कार केली लॉंच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत