त्यापैकी एक Hyundai i20 Active आहे जी स्पोर्टी डिझाइन, प्रीमियम फीचर्स आणि चांगल्या मायलेजसाठी पसंत केली जाते. जर तुम्ही ही कार शोरूममधून खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ६.६६ लाख ते १०.९ लाख रुपये खर्च करावे लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण जर तुम्हाला ही कार कमी बजेटमध्ये खरेदी करायची असेल, तर ही ऑफर तुमच्या उपयोगाची आहे. या ऑफरमधून तुम्हाला ही कार ५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी घेऊन जाता येणार आहे.

या Hyundai i20 Active वर आजची ऑफर CARS24 ने दिली आहे, याची जाहिरात त्यांच्या वेबसाइटवर पोस्ट केली आहे आणि या ऑफरमध्ये कारची किंमत ४ लाख ७६ हजार रुपये देण्यात आली आहे.

आणखी वाचा : शानदार ऑफर! झीरो डाऊन पेमेंटवर दोन लाखांमध्ये खरेदी करा Renault KWID

या कारबद्दल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, याचे मॉडेल मे २०१६ चे आहे आणि ती आतापर्यंत ९७,८३७ किमी धावली आहे, या Hyundai i20 Active ची फर्स्ट ओनरशीप आहे आणि तिची नोंदणी दिल्लीतील DL 3C RTO ऑफिसमध्ये आहे.

ही कार खरेदी केल्यावर, कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी योजना देत आहे, तसेच सात दिवसांच्या मनी बॅक गॅरंटी योजनेसह.

आणखी वाचा : Bentley आणणार आलिशान इलेक्ट्रिक कार, कंपनीची जोरदार तयारी, पाहा लॉन्चिंग डेट

या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, जर तुम्ही कार खरेदी केली आणि तुम्हाला ती सात दिवसांच्या आत आवडली नाही किंवा त्यात काही दोष आढळला, तर तुम्ही कंपनीला परत केल्यावर तुमच्याकडून कोणतेही शुल्क न घेता कंपनीला परत करू शकता. तुम्ही केलेले पेमेंट कोणत्याही प्रश्नाशिवाय किंवा कोणत्याही कपातीशिवाय परत केले जाईल.

यासह कंपनी ५००० रुपयांची सहा महिन्यांची पॅन इंडिया रोड साइड असिस्टन्स योजना ऑफर करत आहे, ज्यासाठी RT हस्तांतरणासाठी ५००० रुपये शुल्क आकारले जाणार नाही.

याशिवाय, कंपनी शिपिंग शुल्कासाठी ५००० रुपये आकारणार नाही आणि ५००० रुपयांपर्यंतचा थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील देईल. ज्या लोकांकडे ही कार घेण्याचे बजेट नाही, त्यांना कंपनी आकर्षक प्लॅनसह कर्जाची सुविधाही देत ​​आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand hyundai i20 active in 4 lakh budget with loan and guarantee warranty plan prp
First published on: 27-01-2022 at 22:24 IST