कार क्षेत्रातील हॅचबॅक सेगमेंटमधील गाड्यांना कमी मायलेज आणि कमी किमतीमुळे पसंती दिली जाते, ज्यांची किंमत रु. ३.२५ लाख ते रु. ८ लाख आहे.

ज्यामध्ये आम्ही या सेगमेंटमधील लोकप्रिय कार, Hyundai Santro बद्दल बोलत आहोत, जी तिच्या फीचर्स आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा

शोरूममधून Hyundai Santro खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५ ते ७ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागू शकते, परंतु या ऑफरद्वारे तुम्ही ही कार फक्त २ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. परंतु ती ऑफर जाणून घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या कारची फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि संपूर्ण डिटेल्स खालीलप्रमाणे.

Hyundai Santro 2012 बद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीने या कारमध्ये १०८६ cc इंजिन दिले आहे, जे ६३ PS पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करते, जे मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

कारच्या फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, मॅन्युअल एसी, टॅकोमीटर, इलेक्ट्रिक मल्टी-ट्रिप मीटर, ग्लोव्ह कंपार्टमेंट, रिमोट ट्रंक ओपनर, लो फ्यूल वार्निंग लाइट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

आणखी वाचा : फक्त १.५ ते २ लाखांच्या बजेटमध्ये मिळतेय Maruti WagonR, जाणून घ्या ऑफर

याशिवाय सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक, डे लाईन रिअर व्ह्यू मिरर, डोअर अजर वॉर्निंग, कीलेस एंट्री, अँटी थेफ्ट डिव्हाईस यांसारखे फिचर्स कारमध्ये देण्यात आले आहेत.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Hyundai Santro कार १७.९२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Hyundai Santro चे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर, आता तुम्हाला ही कार अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करण्याच्या ऑफरचे संपूर्ण डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे.

CARDEKHO वेबसाइटने ही Hyundai Santro विक्रीसाठी पोस्ट केली आहे ज्याचे मॉडेल २०१२ आहे आणि त्याची किंमत १.९५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

आणखी वाचा : जर तुम्ही Electric Bike किंवा Scooter घेण्याचा विचार करत असाल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा

Hyundai Santro चे २०१२ चे हे मॉडेल CARWALE वेबसाइटवर १.९५ लाख किमतीत विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे.

Hyundai Santro चे २०१० चे हे मॉडेल DROOM वेबसाइटवर १,५८,५८५ रुपये किमतीच्या कर्ज सुविधेसह विक्रीसाठी पोस्ट केले आहे.

येथे नमूद केलेल्या तीनही Hyundai Santro पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर आणि त्यांचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट आणि प्राधान्यानुसार या तीनपैकी कोणतीही कार खरेदी करू शकता.