स्पोर्ट्स बाईक सेगमेंट हा टू व्हीलर क्षेत्रातील एक महागडा आणि प्रीमियम सेगमेंट आहे ज्यामध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या बाईक्सना प्राधान्य दिले जाते. KTM, Bajaj, Yamaha, Honda, TVS आणि Hero यांसारख्या कंपन्यांच्या मोठ्या संख्येने बाईक्स या सेगमेंटमध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पोर्ट्स बाईक्सच्या सध्याच्या रेंजमध्ये आज आम्ही KTM Duke 200 बद्दल बोलत आहोत जी या सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक्सपैकी एक आहे. ही बाईक तिच्या डिझाईन आणि स्पीडसाठी पसंत केली जाते.

जर तुम्ही ही बाईक शोरूममधून खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला २ लाख रुपयांहून अधिक खर्च करावा लागेल. जर तुमच्याकडे ही बाईक घेण्याचे बजेट नसेल तर येथे जाणून घ्या या बाईकवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक १ लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकते.

KTM Duke 200 वर उपलब्ध असलेल्या या ऑफर सेकंड हँड वाहनांची खरेदी, विक्री आणि लिस्टिंग करणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफरचे डिटेल्स सांगणार आहोत.

आणखी वाचा : मोठ्या फॅमिलीसाठी केवळ १ लाखाच्या बजेटमध्ये घरी घेऊन जा Maruti Eeco, वाचा ऑफर

पहिली ऑफर DROOM वेबसाईटवर देण्यात आली आहे, जिथे या बाईकचे २०१५ चे मॉडेल लीस्ट केले आहे. येथे या बाईकची किंमत ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून बाईक खरेदी केल्यास तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर पोस्ट केली आहे. येथे KTM Duke 200 चे २०१६ च मॉडेल लीस्ट केले आहे. येथे या बाईकची किंमत ७० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. येथून ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

तिसरी ऑफर BIKEDEKHO वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. येथे या KTM Duke 200 चे २०१४ चे मॉडेल विक्रीसाठी लीस्ट केली आहे. या बाईकची किंमत ७० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला कोणतेही कर्ज किंवा इतर ऑफर मिळणार नाही.

आणखी वाचा : Cheapest Cars India: देशातील टॉप ३ सर्वात स्वस्त कार, ४ लाखांच्या बजेटमध्ये, ज्या २४ kmpl पर्यंत मायलेज देतात

KTM Duke 200 वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर, जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल, तर आता या बाईकच्या इंजिनपासून ते मायलेजपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

या स्पोर्ट्स बाईकमध्ये कंपनीने १९९.५ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन बसवले आहे. हे इंजिन २५.८३ पीएस पॉवर आणि १९.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या इंजिनसोबत ६ स्पीड गिअरबॉक्स बसवला आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्पोर्ट्स बाईक ३५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand ktm duke 200 under 1 lakh with finance plan read offers and complete details of sports bike prp
First published on: 18-08-2022 at 21:27 IST