स्पोर्ट्स बाईक घ्यायचीय? पण बजेट कमी आहे, मग KTM RC 390 फक्त १ लाखात घ्या, वाचा संपूर्ण ऑफर

तुम्ही शोरूममधून KTM RC 390 खरेदी केल्यास तुम्हाला यासाठी ३.१४ लाख रुपये खर्च करावे लागतील. पण येथे नमूद केलेल्या ऑफर्सद्वारे तुम्ही ही बाईक फक्त १ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

Second-hand-KTM-RC-390
(फोटो- OLX)

देशातील दुचाकी क्षेत्रातील बाईक सेगमेंटमध्ये कमी बजेटच्या मायलेज बाईक्सनंतर, स्पोर्ट्स बाईकची मागणी खूप जास्त आहे. या बाईक्स वेगाची आवड असलेल्या तरुणांच्या पसंतीच्या असतात. पण त्यांची किंमत जास्त असल्याने अनेकदा लोक या बाईक्स पसंत करूनही खरेदी करू शकत नाहीत.

जर तुम्हीही स्पोर्ट्स बाईक्सचे शौकीन असाल, परंतु या बाईक्सच्या किमतीमुळे तुमचे बजेट तयार झाले नाही, तर या सेगमेंटची लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक KTM RC 390 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती येथे जाणून घ्या.

तुम्ही शोरूममधून KTM RC 390 खरेदी केल्यास तुम्हाला यासाठी ३.१४ लाख रुपये खर्च करावे लागतील. पण येथे नमूद केलेल्या ऑफर्सद्वारे तुम्ही ही बाईक फक्त १ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

आणखी वाचा : मोठं कुटुंब आणि बजेट छोटं आहे? मग ४ लाखांपेक्षा कमी किमतीत घ्या Maruti Ertiga

या स्पोर्ट्स बाईकवरील ऑफर्स वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी निवडक ऑफर्सची माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत जेणेकरून तुम्ही कमी बजेटमध्ये चांगली बाईक खरेदी करू शकता.

KTM RC 390 वरील पहिली ऑफर OLX वेबसाइटवरून आली आहे जिथे बाईकचे २०१६ चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे या बाईकची किंमत १ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा लोन ऑफर मिळणार नाही.

दुसरी ऑफर BIKEDEKHO वेबसाइटवर दिली आहे. येथे या KTM RC 390 चे २०१८ चे मॉडेल पोस्ट केले आहे, ज्याची किंमत १.२० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्हाला येथून बाईक खरेदी करण्यासाठी कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

आणखी वाचा : ४ लाखांपेक्षाही कमी किमतीत मिळतेय Tata Tigor, जाणून घ्या ऑफर?

तिसरी ऑफर DROOM वेबसाइटवरून आली आहे जिथे KTM RC 390 चे २०१५ चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे या बाईकची किंमत १ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून ही स्पोर्ट्स बाईक खरेदी करून तुम्हाला कंपनीकडून फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

KTM RC 390 वर नमूद केलेल्या ऑफरचे डिटेल्स वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या बजेट आणि प्राधान्यांनुसार तीनपैकी कोणतेही पर्याय खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand ktm rc 390 in 1 lakh with finance plan read complete details of offer with sports bike prp

Next Story
मोठं कुटुंब आणि बजेट छोटं आहे? मग ४ लाखांपेक्षा कमी किमतीत घ्या Maruti Ertiga
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी