scorecardresearch

Mahindra Scorpio आता केवळ ४ लाखांमध्ये मिळतेय, वाचा संपूर्ण ऑफर

ही ऑफर लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओबद्दल आहे, जी तिच्या मजबूत डिझाइन आणि पॉवरसाठी पसंत केली जाते.

Mahindra-Scorpio-12
(फोटो-OLX)

कार सेक्टरचा SUV सेगमेंट आज बड्या रेंजचा सेगमेंट बनला आहे. यात मायक्रो SUV पासून मिड साईज SUV आणि प्रीमियम SUV पर्यंत मोठ्या संख्येने असलेल्या कार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

या सेगमेंटमध्ये सध्या असलेल्या एसयूव्हीमध्ये, आम्ही या सेगमेंटमधील लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओबद्दल बोलत आहोत, जी तिच्या मजबूत डिझाइन आणि पॉवरसाठी पसंत केली जाते.

महिंद्रा स्कॉर्पिओवर उपलब्ध ऑफर ऑनलाइन सेकंड हँड वाहन खरेदी आणि विक्री वेबसाइटवरून आल्या आहेत, ज्यावरून आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची संपूर्ण माहिती देऊ.

महिंद्रा स्कॉर्पिओवरील आजची पहिली ऑफर CARDEKHO वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या SUV चे २०१४ चे मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे. इथे या SUV ची किंमत ४.६५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओवरील दुसरी ऑफर CARWALE वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या SUV चे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. इथे या SUV ची किंमत २.९४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

तिसरी ऑफर OLX वेबसाइटवर आली आहे जिथे महिंद्रा स्कॉर्पिओचे २०१३ चे मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे. या एसयूव्हीची किंमत येथे ३ लाख ६० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला ती खरेदी करायची असेल, तर या एसयूव्हीचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण डिटेल्स एकदा वाचा.

आणखी वाचा : Ola Electric बनली नंबर १, हिरो इलेक्ट्रिकला टाकलं मागे, कंपनीच्या स्कूटर्सची जोरदार विक्री

Mahindra Scorpio मध्ये कंपनीने 2179 cc चे इंजिन दिले आहे. हे इंजिन 120 PS पॉवर आणि 280 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही महिंद्रा स्कॉर्पिओ 15 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि स्पीड अलर्ट यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand mahindra scorpio in 4 lakh budget know full details of suv along with offers prp

ताज्या बातम्या