कार सेक्टरचा SUV सेगमेंट हा एक प्रीमियम सेगमेंट आहे ज्यामध्ये आगामी कार त्यांची मजबूती, फीचर्स आणि डिझाइनसाठी पसंत केल्या जातात. आज आम्ही या सेगमेंटमध्ये असलेल्या SUV कार्सपैकी महिंद्रा स्कॉर्पिओबद्दल बोलत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिंद्रा कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओचा नवा लूक बाजारात आणला आहे. ज्याची किंमत ११.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला ही SUV आवडली असेल पण तुमचे बजेट इतके मोठे नसेल, तर या SUV वर उपलब्ध असलेल्या डीलची माहिती येथे जाणून घ्या.

महिंद्रा स्कॉर्पिओवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे तपशील सांगणार आहोत. जेणेकरून कमी बजेटमध्ये ही SUV चालवण्याचा तुमचा छंद तुम्ही पूर्ण करू शकता.

महिंद्रा स्कॉर्पिओवरील पहिली ऑफर OLX वेबसाइटवरून आली आहे जिथे या SUV चे २०१४ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. येथे त्याची किंमत ३,७०,००० रुपये ठेवण्यात आली आहे. ही SUV खरेदी करताना तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

आणखी वाचा : Kawasaki Versys 650 भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

दुसरी ऑफर CARTRADE वेबसाइटवरून आली आहे जिथे या महिंद्रा स्कॉर्पिओचे २०१४ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. येथे या एसयूव्हीची किंमत ४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही SUV खरेदी करताना तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर मिळणार नाहीत.

तिसरी ऑफर CARWALE वेबसाइटवर देण्यात आली आहे जिथे या SUV चे २०१४ चे मॉडेल लिस्ट केले गेले आहे. इथे त्याची किंमत ४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु तुम्हाला ती खरेदी करताना कोणतीही ऑफर किंवा प्लन दिला जाणार नाही.

महिंद्रा स्कॉर्पिओवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर, तुम्हाला या एसयूव्हीचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. जाणून घेऊया…

आणखी वाचा : Royal Enfield Classic 350 Halcyon Series Finance Plan: ड्युअल ABS असलेली ही क्रूझर बाईक केवळ २२ हजारात

महिंद्रा स्कॉर्पिओ २०१४ च्या मॉडेलचे इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात चार सिलेंडर असलेले २१७९ सीसी इंजिन आहे जे एम हॉक इंजिन आहे. हे इंजिन १२० bhp पॉवर आणि २९० Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही महिंद्रा स्कॉर्पिओ १५.४ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand mahindra scorpio under 4 lakh read full details of suv with offers prp
First published on: 29-06-2022 at 19:26 IST