ऑफ रोड SUV सेगमेंटमध्ये फक्त काही SUV आहेत, त्यापैकी एक महिंद्र थार आहे, ज्यांना त्याच्या डिझाइनसाठी तसंच त्याच्या इंजिन, साहसी आणि स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजसाठी पसंत केली जाते.

Mahindra Thar Price

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
What should parents do to reduce childrens mobile usage
Health Special : मुलांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी आईवडिलांनी काय करावं?

महिंद्रा थारची किंमत १३. ५३ लाखापासून ते १६.०३ लाखापर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) असते. काही लोकांना ही गाडी आवडते पण तिच्या किंमतीमुळे बरेच लोक ती खरेदी करण्यासाठी बजेट तयार करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन आम्ही या एसयूव्हीच्या सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध असलेल्या काही ऑफर्सची यादी करत आहोत ज्या तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात.

महिंद्रा थारवरील या ऑफर्स सेकंड हँड वाहनांची खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाइटवरून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी त्यांची मूळ स्थिती, कागद आणि इतर गोष्टी तपासूनच डील फायनल करा, अन्यथा तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते.

Second Hand Mahindra Thar खरेदी करण्याची पहिली ऑफर DROOM वेबसाइटवरून घेतली आहे. महिंद्रा थारचे २०१५ चे मॉडेल येथे लीस्ट केले आहे ज्याची नोंदणी हरियाणा क्रमांकावर आहे. या एसयूव्हीची किंमत ४.४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला फायनान्स प्लॅनची ​​सुविधा देखील मिळू शकते.

आणखी वाचा : केवळ ४५ हजार भरून घरी घेऊन जा Datsun redi GO, जाणून घ्या EMI

Mahindra Thar Second Hand मॉडेलवर उपलब्ध असलेली दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर देण्यात आली आहे. येथे महिंद्रा थारचे २०१५ चे मॉडेल उत्तर प्रदेशमध्ये नोंदणीसह विक्रीसाठी लीस्ट आहे. त्याची किंमत ४.७५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या SUV सोबत कोणताही फायनान्स प्लॅन किंवा कर्ज उपलब्ध होणार नाही.

Used Mahindra Thar वर तिसरी ऑफर CARTRADE वेबसाइटवरून घेतली गेली आहे जिथे या SUV चे २०१६ चे मॉडेल लिस्ट केले गेले आहे. या एसयूव्हीची किंमत ५.५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या SUV सोबत कोणत्याही प्रकारची कोणताही फायनान्स प्लॅन किंवा कर्ज उपलब्ध होणार नाही.

महिंद्र थारच्या सेकंड हँड मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर तुम्हाला या एसयूव्हीबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर त्याचे इंजिन, मायलेज आणि फीचर्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

महिंद्रा थारच्या २०१६ च्या मॉडेलचे इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात २५२३ cc 4-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ६३ bhp पॉवर आणि १८२.५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

महिंद्रा थारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की एसयूव्ही १६.५५ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI प्रमाणित आहे.