आकर्षक डिझाइन, उत्तम केबिन जागा आणि प्रीमियम फिचर्ससह मोठी मायलेज देणार्‍या मिड-रेंज प्रीमियम कारसाठी कार क्षेत्रातील सेडान सेगमेंटला प्राधान्य दिलं जातं.

तुम्हालाही सेडान कार घ्यायची असेल आणि तुमच्याकडे लाखो रुपयांचे बजेट नसेल, तर काळजी करू नका. कारण या सेगमेंटची लोकप्रिय कार मारुती सियाझ आकर्षक ऑफर्ससह अतिशय कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

Maruti Ciaz ची सुरुवातीची किंमत ८.८७ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटमध्ये जाताना ११.८६ लाख रुपयांपर्यंत जाते, परंतु या ऑफर्समध्ये ही कार केवळ ५ लाखांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे.

या ऑफर्स ऑनलाइन सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री वेबसाइटद्वारे आल्या आहेत, ज्यावरून आम्ही तुम्हाला सर्वोत्तम पर्यायाची संपूर्ण माहिती सांगतोय.

MARUTI TRUE VALUE वेबसाइटने या Maruti Ciaz चे 2015 चे डिझेल व्हेरिएंट लीस्ट केलं आहे, ज्याची किंमत ३,६०,००० रुपये ठेवण्यात आली आहे आणि कंपनी या कारसोबत फायनान्स प्लॅन, ६ महिन्यांची वॉरंटी आणि ३ सेवा मोफत देत आहे.

CARDEKHO वेबसाइटने मारुती सियाझचे 2014 मॉडेल लीस्ट केलं आहे, ज्यासाठी कंपनीने ४,१०,००० रुपये किंमत निश्चित केली आहे. यासोबतच गॅरंटी वॉरंटी आणि फायनान्स प्लान देखील मिळत आहे.

DROOM वेबसाइटने आपल्या साइटवर या मारुती सियाझचे 2015 मॉडेल लीस्ट केलं आहे, ज्याची किंमत ४,३५,४०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनी या कारसह फायनान्स प्लॅन देखील ऑफर करत आहे.

आणखी वाचा : Poise NX120 आणि Poise Grace इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, किंमत ते रेंजपर्यंत संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

मारुती सियाझवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्स वाचल्यानंतर, तुम्हाला या सेडानची फिचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या.

Maruti Ciaz 1248 cc इंजिनद्वारे समर्थित आहे जे 88.5 bhp पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

कारच्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, यात पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, एअर क्वालिटी कंट्रोल, रिमोट ट्रंक ओपनर, कमी इंधन चेतावणी प्रकाश, मागील एसी व्हेंट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फॅब्रिक अपहोल्स्ट्री यांसारखी फिचर्स आहेत.

कारच्या सुरक्षेच्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, सीट बेल्ट वॉर्निंग, डोअर एजर वॉर्निंग, कीलेस एंट्री, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही कार २६.२१ kmpl चा मायलेज देते ज्याला ARAI ने प्रमाणित केले आहे.