कार सेक्टरमध्ये, MPV-व्हॅन सेगमेंटमध्ये येणाऱ्या गाड्यांना सेकेंड हॅंड युजसाठी प्राधान्य दिले जाते. ज्यामध्ये या गाड्या कौटुंबिक वापरासोबतच व्यावसायिक कामासाठी वापरल्या जातात.

या सेगमेंटमधील अनेक MPV कार्सपैकी एक मारुती Eeco आहे, जी कमी किमतीत आणि मोठ्या केबिन स्पेससाठी पसंत केली जाते. Maruti Eeco ची सुरुवातीची किंमत ४.५३ लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटवर ५.८८ लाख रुपयांपर्यंत जाते.

passengers struggle with online ticketing system uts of mumbai local sparks debate
“एसीत बसलेल्या बाबूला..” मुंबई लोकल तिकीट बुकींच्या UTS ॲपमधील ‘त्या’ गोष्टीवर प्रवाशाचा संताप; पाहा photo
ticket Gujarati
डोंबिवली रेल्वे स्थानकात गुजराती भाषेत तिकीट ?
What SC Said ?
“अध्यक्षांनी ‘खरी शिवसेना’ विधानसभेतील बहुमतावर ठरवणं आमच्या निर्णयाविरोधात नाही का?”, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Second-hand-7-seater-Maruti-Eeco
मोठ्या कुटुंबासाठी Maruti Suzuki ची ६ लाखाची ‘ही’ ७ सीटर कार १ लाखात आणा घरी; पाहा कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला ही कार तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी खरेदी करायची असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही या कारवर उपलब्ध असलेल्या आकर्षक ऑफर्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तुमच्या उपयोगाची ठरू शकते.

Maruti Eeco वरील ऑफर ऑनलाइन सेकेंड हॅंड कार खरेदी आणि विक्री करणार्‍या वेबसाइटवरून आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे संपूर्ण डिटेल्स सांगत आहोत जेणेकरुन तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये स्वतःसाठी योग्य पर्याय खरेदी करू शकाल.

Maruti Eeco वरील आजची पहिली ऑफर CARWALE वेबसाइटवरून आली आहे जिथे या कारचे 2011 मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत १.१ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Maruti Eeco वरील दुसरी ऑफर MARUTI TRUE VALUE च्या वेबसाइटवरून आली आहे जिथे त्याचे 2012 मॉडेल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. त्याची किंमत १,५०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि कंपनी त्यासोबत तीन मोफत सेवा आणि फायनान्स प्लॅन देखील देत आहे.

आणखी वाचा : शानदार ऑफर! केवळ १.१५ लाखात घरी आणा Hyundai Getz कार

तिसरी ऑफर CARDEKHO वेबसाइटवरून आली आहे जिथे त्याचे 2012 मॉडेल पोस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत १,७५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कारसोबत कोणतीही फायनान्स ऑफर किंवा योजना दिली जात नाही.

मारुती ईको इंजिन: मारुती ईकोमध्ये 1196 cc चे 1.2 लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले 73 PS पॉवर आणि 98 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

मारुती ईको मायलेज: Maruti Eeco च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही व्हॅन पेट्रोलवर 16.1 kmpl आणि CNG वर 20.88 kmpl मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मारुती ईको फिचर्स: मारुती Eeco च्या फिचर्सबद्दल बोलायचे तर, यात मॅन्युअल एसी, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD, फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी फिचर्स आहेत.