मोठं कुटुंब आणि बजेट छोटं आहे? मग ४ लाखांपेक्षा कमी किमतीत घ्या Maruti Ertiga

या मारुती अर्टिगाची सुरुवातीची किंमत ८.३५ लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये १२.७९ लाख रुपयांपर्यंत जाते. ऑफरद्वारे तुम्ही ही मारुती अर्टिगा अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

Second-Hand-Maruti-Ertiga
(फोटो- OLX)

कार क्षेत्रातील MPV कार सेगमेंटला त्याच्या मल्टीपर्पज कारसाठी पसंत केला जातो. या कार्सचा वापर घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे केला जातो. या सेगमेंटमध्ये मारुती, महिंद्रा, रेनॉल्ट, ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांच्या ७ सीटर एमपीव्ही सर्वात जास्त आहेत.

त्यापैकी आम्ही मारुती एर्टिगा बद्दल बोलत आहोत जी किंमत, फीचर्स आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. या मारुती अर्टिगाची सुरुवातीची किंमत ८.३५ लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये १२.७९ लाख रुपयांपर्यंत जाते.

परंतु येथे नमूद केलेल्या ऑफरद्वारे तुम्ही ही मारुती अर्टिगा अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता. या MPV वर उपलब्ध ऑफर्स वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून प्राप्त झाल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती सांगत आहोत.

पहिली ऑफर CARTRADE वेबसाइटवरून आली आहे जिथे या मारुती अर्टिगाचे २०१४ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. येथे या कारची किंमत ३.४५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना कोणतीही आर्थिक ऑफर किंवा प्लॅन असणार नाही.

आणखी वाचा : ४ लाखांपेक्षाही कमी किमतीत मिळतेय Tata Tigor, जाणून घ्या ऑफर?

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर दिली आहे. मारुती अर्टिगाचे २०१४ चे मॉडेल येथे पोस्ट केले आहे आणि त्याची किंमत ३.६० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

तिसरी ऑफर CARWALE वेबसाइटवरून आली आहे जिथे या मारुती अर्टिगाचे २०१५ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. इथे या कारची किंमत ४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि ती खरेदी करताना तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळू शकतो.

इथे नमूद केलेल्या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

आणखी वाचा : ग्राहकांना आणखी एक झटका! Hero MotoCorp बाईक आणि स्कूटर जुलैपासून ३ हजार रुपयांनी महागणार

मारुती एर्टिगाच्या २०१४ च्या मॉडेलबद्दल बोलायचे तर कंपनीने यात १३७३ सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन ९३.७ bhp पॉवर आणि १३० Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबाबत, मारुती सुझुकीचा दावा आहे की ही अर्टिगा १६.०२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand maruti ertiga under 4 lakh read offers and complete details of mpv prp

Next Story
Petrol Diesel Price Today: २५ जूनला पेट्रोल आणि डिझेलचा महाराष्ट्रातील दर किती?
फोटो गॅलरी