कार सेक्टरमधल्या MPV सेगमेंटमध्ये येणार्‍या कार्सना मोठमोठ्या कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणासाठी प्राधान्य दिले जातात. जे मिड रेंजपासून मोठ्या रेंजपर्यंत उपस्थित आहेत. या रेंजमध्ये आम्ही मारुती एर्टिगाबद्दल बोलत आहोत जी या सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. Maruti Ertiga ची सुरुवातीची किंमत ८.३५ लाख रुपयांपासून सुरू होते, जी टॉप मॉडेलवर जाते तेव्हा ती १२.७९ लाख रुपयांपर्यंत जाते. ही MPV लोकांना आवडत असली तरी तिच्या किमतीमुळे अनेकांना विकत घेता येत नाही.

हे लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला अशाच काही ऑफर्सची माहिती सांगत आहोत ज्यात तुम्हाला ही कार फक्त ४ लाख रुपयांच्या बजेटमध्ये मिळू शकते. या ऑफर्स सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री वेबसाइटवरून प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती सांगणार आहोत.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

Maruti Ertiga वर पहिली ऑफर CARWALE वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या कारचे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ३.९५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि तुम्ही ती खरेदी करून फायनान्स प्लॅन देखील मिळवू शकता.

आणखी वाचा : Maruti Suzuki Car Discount July 2022: ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या कोणती कार घेणं फायदेशीर ठरेल?

दुसरी ऑफर या MPV वर CARDEKHO वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे, जिथे या मारुती अर्टिगाचे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या कारची किंमत ४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि ती खरेदी केल्यावर तुम्हाला फायनान्स प्लॅनसह मनी बॅक गॅरंटी मिळेल.

तिसरी ऑफर OLX वेबसाइटवर देण्यात आली आहे. इथे या कारचे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत ३,४५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु तुम्हाला ते खरेदी करताना कोणताही फायनान्स प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही.

आणखी वाचा : एका चार्जमध्ये ८५ किमीची रेंज आणि २५ किमी प्रतितास असा टॉप स्पीड, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या

मारुती एर्टिगा वर उपलब्ध ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर, जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर या कारचे इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

मारुती एर्टिगा २०१२ च्या मॉडेलचे इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १३७३ cc चार-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन ९३.७ bhp पॉवर आणि १३० Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही मारुती एर्टिगा १६.०२ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.