scorecardresearch

धमाकेदार ऑफर! ७ लाखांची Maruti Swift Dzire अवघ्या ३.८ लाखात, जाणून घ्या सविस्तर…

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. या ऑफरमधून तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.

Maruti-Swift-Dzire
(फोटो- CARDEKHO)

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल.

करोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणं गरजेचं झालं आहे. जर आपण सेकंड हँड कार विकत घेण्याचा विचार करत असाल. परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

शानदार डिझाईन, मायलेज आणि फीचर्समुळे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर ही कार मारुतीची सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. या कारची किंमत ६.८१ लाख रुपयांपासून सुरु होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी तुम्हाला १०.२० लाख रुपये मोजावे लागतील. परंतु ही कार सेकेंड हँडमध्ये अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळतेय. अवघ्या ३.८० लाख रूपयांमध्ये ही कार तुम्ही खरेदी करू शकता.

आणखी वाचा : भेटीला येत आहे Vaan Electric Moto ची ‘Urbansport’ ई-बाईक, अर्ध्या युनिटमध्येच चार्ज होते, फीचर्स, रेंज आणि किंमत जाणून घ्या

CARDEKHO या वेबसाईटवर ही ऑफर आहे. वेबसाइटवर दिलेल्या या कारच्या माहितीनुसार, या मारुती स्विफ्ट डिझायरचे मॉडेल ऑगस्ट २०१४ मधलं आहे आणि त्याचे व्हेरियंट VXi आहे. कारने आतापर्यंत ६५,५६७ किमी अंतर कापले आहे आणि त्याची नोंदणी दिल्लीतील DL 2C RTO कार्यालयात झाली आहे. ही कार खरेदी केल्यावर कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत ​​आहे.

आणखी वाचा : शानदार ऑफर! केवळ २ लाखांमध्ये Maruti Wagon R खरेदी करण्याची संधी, आवडली नाही तर परत करा

या मनी बॅक गॅरंटीनुसार, जर तुम्ही ही कार खरेदी केली आणि ७ दिवसांच्या आत त्यात काही दोष आढळला, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. कार परत केल्यानंतर, कंपनी तुमच्याकडून केलेल्या पेमेंटमध्ये कोणतीही कपात न करता तुम्हाला पूर्ण पेमेंट परत करेल. याशिवाय, कंपनी सहा महिन्यांचा पॅन इंडिया रोड साइड असिस्टन्स प्लॅन देईल ज्याची किंमत ५,००० रुपये आहे आणि त्यासाठी ५,००० रुपये आरसी ट्रान्सफर शुल्क आकारले जाणार नाही.

ज्यांना ही कार कर्जावर घ्यायची आहे, त्यांच्यासाठी कंपनी आकर्षक ईएमआय प्लॅनसह कर्जाची सुविधाही देत ​​आहे. या सर्वांशिवाय कंपनी ५००० रुपये शिपिंग शुल्क आकारणार नाही आणि ५००० रुपयांपर्यंतचा थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील कंपनीतर्फे मोफत दिला जाईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand maruti swift dzire in 4 lakh budget with loan guarantee and warranty plans prp

ताज्या बातम्या