scorecardresearch

Maruti Swift केवळ १ लाखांच्या फायनान्स प्लॅनसह मिळतेय, वाचा ऑफर

जर तुम्हाला ही कार आवडत असेल, परंतु तुम्ही यासाठी ६ लाख रुपयांचे बजेट बनवू शकत नसाल, तर ही माहिती नक्की वाचा.

Maruti Swift केवळ १ लाखांच्या फायनान्स प्लॅनसह मिळतेय, वाचा ऑफर
फोटो- CARDEKHO)

मारुती स्विफ्ट कार क्षेत्रातील हॅचबॅक सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे, जी तिच्या स्पोर्टी डिझाईनमुळे तसेच किंमत आणि मायलेजमुळे प्रचंड यशस्वी ठरली आहे. या कारची सुरुवातीची किंमत ५.९२ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि टॉप व्हेरिएंटमध्ये ही किंमत ८.८५ लाख रुपये आहे.

जर तुम्हाला ही कार आवडत असेल, परंतु तुम्ही यासाठी ६ लाख रुपयांचे बजेट बनवू शकत नसाल, तर ही कार घेण्यासाठी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे सेकंड हँड कार आहे, जी तुम्हाला सहज आणि कमी बजेटमध्ये मिळेल.

पण जर तुम्हाला डीलरला न भेटता घरी बसून कार घ्यायची असेल तर येथे जाणून घ्या त्या ऑफर्सची माहिती ज्यामध्ये तुम्ही ही कार १ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

मारुती स्विफ्ट सेकंड हँडवरील पहिली ऑफर DROOM वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या हॅचबॅकचे २०१० चे मॉडेल लीस्ट केले आहे आणि ते दिल्ली क्रमांकावर नोंदणीकृत आहे. या कारची किंमत १ लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि ती खरेदी केल्यावर तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

आणखी वाचा : Low Budget Electric Scooter: केवळ ४२ हजारांच्या बजेटमध्ये मिळतेय ८० किमी रेंजची ही इलेक्ट्रिक स्कूटर

दुसरी ऑफर मारुती स्विफ्ट OLX वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथे हॅचबॅकचे २००९ चे दिल्ली-नोंदणीकृत मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे. यासाठी ८५ हजार रुपये किंमत ठेवण्यात आली आहे, परंतु त्यासोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

वापरलेली मारुती स्विफ्ट खरेदी करण्याची तिसरी ऑफर CARDEKHO वेबसाइटवरून वापरलेल्या कार विभागात उपलब्ध आहे जिथे UP क्रमांकावर नोंदणीकृत २०१० मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले आहे. या कारची किंमत १.१० लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये कोणतीही ऑफर किंवा प्लॅन दिला जात नाही.

आणखी वाचा : ‘या’ तारखेला Tata Tiago EV ची एन्ट्री, सर्वात कमी किंमतीत मोठी ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते

मारुती स्विफ्टच्या सेकंड हँड मॉडेल्सवरील या ऑफर्स वाचून तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची निवड आणि बजेट लक्षात घेऊन तुम्ही येथे नमूद केलेल्या तीन पर्यायांपैकी कोणताही पर्याय खरेदी करू शकता.

पण कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला कारची स्थिती, तिची कागदपत्रे आणि सर्व्हिस हिस्ट्री यांची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, अन्यथा कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second hand maruti swift in 1 lakh budget with finance plan read complete details of car with offer prp

ताज्या बातम्या