scorecardresearch

शानदार ऑफर! झीरो डाऊन पेमेंटवर दोन लाखांमध्ये खरेदी करा Renault KWID

देशात त्या कारना जास्त पसंती मिळते ज्या कमी बजेटमध्ये येतात आणि जास्त मायलेजसह प्रीमियम फिचर्स मिळवतात आणि या कार हॅचबॅक विभागात येतात.

शानदार ऑफर! झीरो डाऊन पेमेंटवर दोन लाखांमध्ये खरेदी करा Renault KWID
(फोटो-CARS24)

कार सेक्टरमध्ये अशा कारची किंमत ३.२५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ८ लाखांपर्यंत जाते. या किमतीमुळे अनेक वेळा कमी बजेट असलेले लोक या कार खरेदी करू शकत नाहीत.

अशा लोकांना लक्षात घेऊनच आज आम्ही एका ऑफरबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही प्रीमियम डिझाइन आणि फीचर्ससह मायलेज देणारी कार अगदी सहज खरेदी करू शकता.

ही ऑफर CARS24 ने दिली आहे. या कारची किंमत २,३९,३९९ रुपये आहे. या कारबाबत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल एप्रिल २०१६ चे असून ती आतापर्यंत ४९,२४८ किमी धावली आहे.

आणखी वाचा : भेटीला येत आहे Vaan Electric Moto ची ‘Urbansport’ ई-बाईक, अर्ध्या युनिटमध्येच चार्ज होते, फीचर्स, रेंज आणि किंमत जाणून घ्या

या Renault Kwid ची मालकी फर्स्ट ओनरशीप आहे आणि त्याची नोंदणी दिल्लीतील DL 8C RTO कार्यालयात झाली आहे. कंपनी या कारच्या खरेदीवर सहा महिन्यांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत ​​आहे.

CARS24 च्या मनी बॅक गॅरंटीनुसार, जर काही दोष आढळल्यास किंवा खरेदी केल्याच्या ७ दिवसांच्या आत तुम्हाला ही कार आवडली नाही तर तुम्ही ही कार कंपनीला परत करू शकता.

आणखी वाचा : शानदार ऑफर! केवळ २ लाखांमध्ये Maruti Wagon R खरेदी करण्याची संधी, आवडली नाही तर परत करा

कार परत केल्यानंतर, कंपनी तुमच्याकडून केलेल्या पेमेंटमध्ये कोणतीही कपात न करता तुम्हाला पूर्ण पेमेंट परत करेल. याशिवाय ज्यांना ही कार कर्जावर घ्यायची आहे त्यांच्यासाठी कंपनीकडून कर्जाची सुविधाही दिली जात आहे.

या कर्ज योजनेनुसार, तुम्ही ही कार झीरो डाऊन पेमेंटसह म्हणजे कोणतेही पैसे न भरता घरी घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा ५,५७९ रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल. या कर्जाची मुदत ६० महिन्यांची आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2022 at 19:38 IST

संबंधित बातम्या