scorecardresearch

अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतेय Royal Enfield Bullet 350; कुठे आणि काय आहे ऑफर? जाणून घ्या

कमी किमतीत क्लासिक डिझाइनसाठी या बाईकला प्राधान्य दिले जाते.

Second-hand-Royal-Enfield-Bullet-350-3
(फोटो- OLX)

क्रूझर बाईक सेगमेंट हा दुचाकी क्षेत्रातील एक प्रीमियम आणि लोकप्रिय विभाग आहे, ज्यामध्ये रॉयल एनफिल्ड व्यतिरिक्त, जावा, यझदी, होंडा, बजाज यांसारख्या कंपन्यांच्या बाईक्स मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

या सेगमेंटमध्ये 350 cc ते 650 cc पर्यंत इंजिन असलेल्या बाईक्स आहेत, ज्यामध्ये आम्ही Royal Enfield Bullet 350 बद्दल बोलत आहोत. कमी किमतीत क्लासिक डिझाइनसाठी या बाईकला प्राधान्य दिले जाते.

शोरूममध्ये या बाईकची किंमत १.४८ लाख ते १.६३ लाख रुपयांपर्यंत आहे. त्याच्या किंमतीमुळे अनेक लोकांना ही बाईक आवडते पण ते विकत घेऊ शकत नाहीत. हे लक्षात घेऊन आम्ही अशा ऑफर्सबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही ही बाईक फक्त ६० हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकाल. या ऑफर सेकंड हँड बाइक्स खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइटवरून घेतल्या आहेत.

आणखी वाचा : ‘या’ तारखेला Tata Tiago EV ची एन्ट्री, सर्वात कमी किंमतीत मोठी ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते

Royal Enfield Bullet 350 च्या सेकंड हँड मॉडेलवर पहिली ऑफर OLX वर देण्यात आली आहे, जिथे त्याचे २०१२ चे मॉडेल लीस्ट केले आहे. ही बाईक दिल्ली क्रमांकावर नोंदणीकृत असून तिची किंमत ६० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक खरेदीवर कोणतीही ऑफर दिली जाणार नाही.

दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवर देण्यात आली आहे, ज्यामध्ये या बाईकचे २०१३ चे मॉडेल लिस्ट करण्यात आले आहे. या बाईकसाठी ६५ हजार रुपये ठेवण्यात आले असून दिल्ली क्रमांकावर ती नोंदणीकृत आहे. ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला एक फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

रॉयल एनफील्ड बुलेट ३५० वर उपलब्ध तिसरी ऑफर QUIKR वेबसाइटवर अपलोड केली आहे जिथे UP क्रमांकासह २०१५ चे मॉडेल लीस्ट केले गेले आहे. या बाईकची किंमत ७० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या बाईकवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सचा तपशील वाचल्यानंतर तुम्हाला ती विकत घ्यायची असल्यास तुम्ही येथे नमूद केलेल्या पर्यायांपैकी कोणताही पर्याय खरेदी करू शकता. परंतु खरेदी करण्यापूर्वी त्याची स्थिती आणि कागदपत्रे नीट तपासा. अन्यथा तुम्हाला नंतर त्रास सहन करावा लागू शकतो.

आणखी वाचा : Low Budget Electric Scooter: केवळ ४२ हजारांच्या बजेटमध्ये मिळतेय ८० किमी रेंजची ही इलेक्ट्रिक स्कूटर

या ऑफरचे तपशील जाणून घेतल्यानंतर तुम्ही या बाईकचे इंजिन, मायलेज, ब्रेकिंग सिस्टम आणि स्पेसिफिकेशनचे प्रत्येक छोटे तपशील वाचले पाहिजेत.

Royal Enfield Bullet 350 मध्ये सिंगल सिलेंडर ३४६ cc इंजिन आहे. हे इंजिन १९.३६ PS पॉवर आणि २८ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढील चाकावर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक असतो. यासोबतच स्पोक व्हील आणि ट्यूब टायर देण्यात आले आहेत.
मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही Royal Enfield Bullet 350 37 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2022 at 20:15 IST
ताज्या बातम्या