टू व्हीलर सेक्टरमधील क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये येणाऱ्या बाईक्स त्यांच्या इंजिन आणि स्टाईलसाठी पसंत केल्या जातात. पण पसंतीनंतरही अनेकदा लोक या बाईक त्यांच्या महागड्या किमतीमुळे खरेदी करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन, आज आम्ही लोकप्रिय क्रूझर सेगमेंट बाईक Royal Enfield Classic 350 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही ही बाईक अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकाल.

Royal Enfield Classic 350 ची सुरुवातीची किंमत १.९० लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटवर जाताना २.२१ लाख रुपये होते, परंतु येथे नमूद केलेल्या ऑफरद्वारे ही बाईक फक्त ५० हजारात घरी घेऊन जाऊ शकता.

Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Even before the arrival of Padwa festival the price of gold is over 72 thousand
पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे!
mumbai, Heroin, Police Arrest, 26 Year Old, Youth, Rs 54 Lakh, Mahim, Raheja Flyover, drugs, crime news, marathi news,
मुंबई : ५४ लाखांच्या हेरॉइनसह एकाला अटक

या बाईकवर उपलब्ध ऑफर्स सेकंड हँड वाहने खरेदी करणाऱ्या विविध वेबसाइट्सवरून आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सची माहिती सांगत आहोत जेणेकरून तुम्हाला कमी किमतीत चांगली क्रूझर बाइक मिळू शकेल.

आणखी वाचा : २ लाख नव्हे केवळ ५० हजारात खरेदी करा KTM 200 Duke, जाणून घ्या ऑफर

पहिली ऑफर QUIKR वेबसाईटवर देण्यात आली आहे जिथे या Royal Enfield Classic 350 चे २०१६ चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे ही किंमत ५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून ही बाईक विकत घेतल्यास तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर मिळणार नाही.

दुसरी ऑफर OLX वेबसाईटवर दिली आहे. या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची २०१४ चे मॉडेल लीस्ट केले आहे. येथे याची किंमत ६० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला येथून बाईक खरेदी करण्यासाठी कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

तिसरी ऑफर BIKES4SALE वेबसाईटवर दिली आहे. येथे या बाईकचे २०१३ चे मॉडेल लिस्ट केले आहे, ज्याची किंमत ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून ही बाईक खरेदी करताना तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

आणखी वाचा : ६ लाखांपेक्षा कमी किमतीतली ही कार पेट्रोल आणि CNG वर देते जबरदस्त मायलेज, जाणून घ्या किंमत

Royal Enfield Classic 350 वर उपलब्ध ऑफरचे तपशील वाचल्यानंतर या बाईकच्या इंजिनपासून ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात ३४९.३४ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २०.२१ PS पॉवर आणि २७ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४०.८ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.