टू व्हीलर सेक्टरमधील बाईक सेगमेंटमध्ये असलेला क्रूझर बाइक सेगमेंट हा प्रीमियम आणि महागडा बाईक सेगमेंट आहे. बर्‍याच लोकांना या सेगमेंटमध्ये येणाऱ्या बाईक आवडतात. पण त्यांच्या किमतीमुळे ते त्या विकत घेऊ शकत नाहीत. 


या सेगमेंटमधील अनेक बाईक्सपैकी एक रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० आहे जी त्याच्या सेगमेंटमध्ये तसेच त्याच्या कंपनीमध्ये सर्वाधिक विकली जाणारी क्रूझर बाईक आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत १.९० लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटवर जाताना २.२१ लाख रुपयांपर्यंत जाते.
हे लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला या रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० वर उपलब्ध असलेल्या ऑफरचे डिटेल्स सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ही बाईक अर्ध्याहून कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकाल.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
RBI bank
रिझर्व्ह बँकेकडून का सुरू आहे सोने खरेदी? गव्हर्नर दास यांनी दिली ही कारणे…
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी


या Royal Enfield Classic 350 वर उपलब्ध ऑफर वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून ऑनलाइन प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी निवडक ऑफर्सची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आणखी वाचा : कुटुंब मोठे असेल तर कमी बजेटमध्ये ही ७ सीटर कार ठरेल बेस्ट ऑप्शन, किंमत ५ लाखांपेक्षा कमी


पहिली ऑफर QUIKR वेबसाइटवरून आली आहे जिथे या बाईकचे २०१८ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. इथे त्याची किंमत ५१,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु ती खरेदी केल्यावर तुम्हाला कोणताही फायनान्स प्लान किंवा इतर ऑफर मिळणार नाही.


दुसरी ऑफर BIKE4SALE वेबसाइटवरून आली आहे जिथे Royal Enfield Classic 350 चे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत ६०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु ती खरेदी करताना कोणतीही ऑफर किंवा प्लान असणार नाही.


तिसरी ऑफर OLX वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या बाईकचे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. इथे त्याची किंमत ६० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला या बाईकसोबत कोणतीही ऑफर किंवा प्लान दिला जाणार नाही.

आणखी वाचा : आता ७ लोकांची मोठी फॅमिली छोट्या बजेटमध्ये प्रवास करेल, केवळ २ लाखात मिळतेय Datsun GO Plus, वाचा ऑफर


Royal Enfield Classic 350 वर उपलब्ध असलेल्या या ऑफरचे डिटेल्स वाचल्यानंतर तुम्हाला या बाईकच्या इंजिनपासून ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पर्यंत संपूर्ण माहिती देणार आहेत.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात ३४९.३४ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन २०.२१  PS पॉवर आणि २७ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही क्लासिक ३५०  क्रूझर ४०.८ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.