देशातील बाईक क्षेत्रातील  एडवेंचर बाइकचा सेगमेंट  खूपच लहान आहे, ज्यामध्ये केवळ निवडक बाइक्स आहेत, परंतु या बाइक्सना प्राधान्य देणाऱ्या तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. 

आज आम्ही रॉयल एनफिल्ड हिमालयन या  एडवेंचर बाइक सेगमेंटमधील लोकप्रिय बाइकबद्दल बोलत आहोत, जी आकर्षक डिझाइन आणि मजबूत इंजिन असलेली बाइक आहे. जर तुम्ही ही रॉयल एनफील्ड हिमालयन शोरूममधून खरेदी करत असाल तर यासाठी तुम्हाला २.१४ लाख ते २.२२ लाख रुपये खर्च करावे लागतील.

diy healthy your cholesterol may not rise if you eat a dozen eggs per week Will this new study change guidelines
दर आठवड्याला डझनभर अंडी खाल्ली तरी वाढणार नाही कोलेस्ट्रॉल पातळी! नवे संशोधन काय सांगते? वाचा
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

जर तुम्हाला ही बाईक आवडली असेल, पण तिची किंमत जास्त असल्यामुळे ती खरेदी करू शकलो नाही, तर या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर तुम्ही ही बाईक अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकाल.

ही ऑफर सेकेंड हँड टू व्हिलर विक्री करणाऱ्या ऑनलाइन वेबसाइटने दिली आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयनचे २०१७  मॉडेल OLX वेबसाइटवर विक्रीसाठी दाखवण्यात आलं आहे, ज्याची किंमत १,०५,००० रुपये आहे. या बाईकचे २०१६ चे मॉडेल DROOM वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट करण्यात आले आहे, ज्याची किंमत १,१०,००० रुपये आहे आणि त्यासोबत फायनान्स प्लॅन देखील दिला जात आहे.

आणखी वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सीएनजीचा आहे देशातील सर्वाधिक दर; पेट्रोल-डिझेलपेक्षाही जास्त भाव

रॉयल एनफिल्ड हिमालयनचे २०१७ मॉडेल BIKEDEKHO वेबसाइटवर १.१८ लाख रुपयांच्या किंमतीसह विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे.

Royal Enfield Himalayan वर उपलब्ध ऑफरचे तपशील जाणून घेतल्यानंतर, त्याचे इंजिन आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित संपूर्ण तपशील जाणून घ्या. 
बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात 411 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 24.31 PS ची पॉवर आणि 32 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक 32.04 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. येथे नमूद केलेल्या तीन पर्यायांचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट आणि पसंतीनुसार या बाईकच्या तीनपैकी कोणताही पर्याय वापरून परवडेल अशी बाईक खरेदी करू शकता.