दुचाकी क्षेत्रात स्कूटर विभागातील मायलेज स्कूटर व्यतिरिक्त स्पोर्टी डिझाइन केलेल्या स्कूटरची मोठी रेंज आहे. या स्पोर्टी डिझाइन स्कूटरपैकी लोकप्रिय स्कूटर TVS Ntorq आहे जी त्याच्या स्पोर्टी डिझाइन आणि वेगवान गतीसाठी पसंत केली जाते.

TVS स्पोर्ट्सची सुरुवातीची किंमत ७५, ४४५ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर ८७,५५० रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही स्कूटर आवडली असेल आणि तुम्हाला ती खरेदी करायची असेल तर अर्ध्यापेक्षा कमी किमतीत ही स्कूटर खरेदी करण्यासाठी संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या.

Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
without btech or engineering diploma degree you can do these technical jobs see list an salary
BTech इंजिनिअरिंग पदवी न घेता करू शकता टेक्निकल क्षेत्रातील ‘या’ नोकऱ्या, कोर्स अन् पगाराबाबत घ्या जाणून
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

या स्कूटरवर मिळालेल्या ऑफर्स ऑनलाइन सेकंड हँड टू व्हीलर खरेदी-विक्रीच्या वेबसाइटवरून आल्या आहेत, त्यापैकी निवडक ऑफर्सची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

TVS Ntorq 125 वरील पहिली ऑफर DROOM वेबसाइटवरून आली आहे जिथे स्कूटरचे २०१९ चे मॉडेल विक्रीसाठी ठेवले आहे. या स्कूटरची किंमत २३,००० रुपये ठेवण्यात आली असून यासोबत तुम्हाला फायनान्स प्लॅनही मिळू शकतो.

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवरून TVS Ntorq वर आली आहे जिथे त्याचे २०१८ चे मॉडेल विक्रीसाठी ठेवले आहे आणि त्याची किंमत ३५,००० रुपये ठेवण्यात आली आहे. इथे या स्कूटरसोबत कोणतीही ऑफर किंवा प्लान उपलब्ध नाही.

TVS Ntorq 125 वरील तिसरी ऑफर QUIKR वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथे त्याचे २०२० चे मॉडेल विक्रीसाठी ठेवले आहे. इथे या स्कूटरची किंमत ३२,००० रुपये ठेवण्यात आली आहे आणि यासोबत कोणत्याही प्रकारची ऑफर नाही.

आणखी वाचा : Suzuki Avenis स्टँडर्ड एडिशन लॉन्च, स्पोर्टी डिझाईनमध्ये मिळणार अनेक उत्तम फीचर्स

TVS Ntorq 125 वर उपलब्ध असलेल्या या तीन ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या स्कूटरची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

स्कूटरमध्ये १२४.८ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन १०.२ PS पॉवर आणि १०.८ Nm पीक टॉर्क जनरेट करते.
स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. ज्यामध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

TVS Ntorq 125 च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ५४.३३ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.