scorecardresearch

SHEMA Electric ने EV India Expo 2022 मध्ये सादर केल्या ३ नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, १३० किमीची रेंज

SHEMA इलेक्ट्रिकने तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Eagle Plus, Griffon आणि Tough Plus सादर केल्या आहेत.

SHEMA Electric ने EV India Expo 2022 मध्ये सादर केल्या ३ नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, १३० किमीची रेंज
(फोटो- SHEMA ELECTRIC)

SHEMA इलेक्ट्रिकने ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या EV India Expo 2022 मध्ये त्यांच्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Eagle Plus, Griffon आणि Tough Plus सादर केल्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार या तिन्ही हाय-स्पीड स्कूटर आहेत.

कंपनीने या EV इंडिया एक्स्पोमध्ये या तीन स्कूटरचे अनावरण केले आहे, जे ऑक्टोबर २०२२ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय बाजारात लॉंच केले जाऊ शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या तिन्ही स्कूटर पूर्णपणे स्वदेशी आहेत. म्हणजेच त्यांची रचना आणि निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया भारतातच पूर्ण झाली आहे.

शेमा इलेक्ट्रिकने या तिन्ही स्कूटर वेगवेगळ्या गरजा आणि पसंती लक्षात घेऊन डिझाईन केल्या आहेत, ज्यामध्ये हाय स्पीडसह फास्ट चार्जिंगचा पर्याय देण्यात आला आहे. आता या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेंज, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

आणखी वाचा : Volkswagen Taigun Anniversary Edition नवीन कलर थीमसह भारतात लॉंच, ११ नवीन फीचर्स मिळतील

SHEMA Eagle Plus Electric Scooter
शेमा ईगल प्लस इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास यात ३.२ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी १२०० W मोटरसह जोडलेली आहे जी BLDC तंत्रज्ञानावर आधारित आहे. कंपनीच्या मते, ही बॅटरी ३.५ ते ४ तासांत पूर्ण चार्ज होते.

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबद्दल दावा केला आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती १२० किमीची रेंज देते आणि या रेंजसह ताशी ५० किमीचा टॉप स्पीड उपलब्ध आहे.

आणखी वाचा : Honda लवकरच भारतात तीन नवीन बाईक लॉंच करणार, वाचा सविस्तर

SHEMA Griffon Electric Scooter
Shema Griffon ही दुसरी हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याची रेंज पूर्ण चार्ज केल्यावर १३० किमीची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. या रेंजसह ६० किमी प्रतितासचा टॉप स्पीड उपलब्ध आहे.
स्कूटर ४.१ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे आणि BLDC तंत्रज्ञानासह १५०० W मोटरशी जोडलेली आहे. सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी ४ तासांत पूर्ण चार्ज होते.

आणखी वाचा : Tata Motors Car Discount September 2022: हॅचबॅकपासून ते SUV पर्यंत, टाटा मोटर्सच्या या गाड्यांवर ४० हजारांपर्यंत सूट

SHEMA Tough Plus Electric Scooter
शेमा इलेक्ट्रिकची तिसरी हाय-स्पीड ई-स्कूटर टफ पल्स आहे जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १३० किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. या रेंजसह ६० किमी प्रतितासचा टॉप स्पीड उपलब्ध आहे.
शेमा टफ प्लस इलेक्ट्रिक स्कूटर ४ kWh LFP बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. यासोबत १५०० W BLDC मोटर जोडण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बॅटरी ४ तासांत पूर्ण चार्ज होते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shema electric unveils three new high speed electric scooters eagle plus griffon and tough plus at ev india expo 2022 read complete details prp

ताज्या बातम्या