Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Compare: चेक रिपब्‍लिक ऑटोमोबाईल निर्माता कंपनी स्कोडा लवकरच त्यांच्या नवीन एसयूव्हीसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. स्कोडा आता देशातील सर्वात प्रसिद्ध सब-फोर मीटर कार विभागात धमाकेदार एंट्री करणार आहे. स्कोडा पुढील महिन्यात आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Skoda Kylaq सादर करणार आहे. बाजारात आल्यानंतर ही कार अनेक मॉडेल्सना टक्कर देईल.

नवीकोरी Skoda Kylaq ही मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV 3X0, Hyundai Venue, Kia Sonet, आणि Nissan Magnite या सब-4 मीटर SUV रेंजमधील सर्वात नवीन ॲडिशन असेल. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्कोडाला फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपली बाजू तगडी ठेवावी लागणार आहे.

Royal Enfield Interceptor Bear 650 unveiled price features and performance will launch soon in india
नाद करायचा नाय! Royal Enfield आणतेय ‘ही’ नवीकोरी बाईक, कमाल फिचर्स, दमदार परफॉरमन्स अन् किंमत…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
TVS Raider iGO variant launched know its features price mileage and ride modes
बजाज पल्सरला टक्कर द्यायला आली ‘TVS’ची ही बाईक, जास्त मायलेजसह मिळतील खास फिचर्स
Maruti Suzuki Dzire 2024
Maruti Suzuki Dzire 2024 : दिवाळीनंतर नवी डिझायर येतेय ग्राहकांच्या भेटीला! जाणून घ्या हटके डिझाइन अन् भन्नाट फीचर्स
Royal Enfield Goan Classic 350
Royal Enfield Goan Classic 350 नोव्हेंबरमध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स अन् डिझाइन
help prevent car theft
कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स करतील मदत
Diwali Festival Discounts Best time to buy TVS iQube
Diwali Festival Discounts: हीच आहे TVS iQube खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ, आताच करा बुक
driving license at the age of 16 know complete criteria
वयाच्या १६ व्या वर्षीही काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स; फक्त ‘या’ अटी कराव्या लागतील पूर्ण

हेही वाचा… दिवाळीत सीएनजी कार घेताय? ‘या’ आहेत बजेटमधील टॉप १० सीएनजी कार्स, मायलेज पाहून लगेच खरेदी कराल

असे म्हटले जाते की, या एसयूव्हीच्या सेगमेंटमधील सगळ्यात बेस्ट-सेलर कार जर कोणती असेल तर ती मारुती सुझुकी ब्रेझा आहे, ज्याची भारतात बऱ्याच काळापासून मागणी आहे. म्हणूनच आगामी स्कोडा Kylaq आणि मारुती सुझुकी ब्रेझा यांच्या इंजिन स्पेसिफिकेशनच्या तुलनेबद्दल जाणून घेऊया.

Skoda Kylaq vs Maruti Suzuki Brezza: इंजिन स्पेसिफिकेशन

स्लाव्हियासारखंच फॅमिलिअर इंजिन Skoda Kylaq वापरते, जी 1.0-लिटर टर्बो पेट्रोल युनिट देते. इंजिन मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मारुती सुझुकी ब्रेझा एक माईल्ड-हायब्रिड 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरते, जे मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक टॉर्क कन्वर्टर गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

इंजिन स्पेसिफिकेशनKylaqBrezza
डिस्प्लेसमेंट1.0-लिटर टर्बो पेट्रोल1.5-लिटर माईल्ड-हायब्रिड
पॉवर114bhp102bhp
टॉर्क178Nm138Nm
गिअरबॉक्सMT/ATMT/AT

वरील नंबर्सचा विचार करता, Kylaq ला विस्थापनाचे तोटे आहेत (displacement disadvantage), तरीही त्याची पॉवर आणि टॉर्क मारुती सुझुकी ब्रेझाच्या तुलनेत अधिक आहे. टर्बोचार्जिंग Kylaq साठी फायद्याचं आहे, तर ब्रेझामधील नॅचरली अ‍ॅसपिरेटेड (NA) इंजिनदेखील एक सुखद अनुभव आहे.

हेही वाचा… चर्चा तर होणारच! ‘या’ स्वस्त एसयूव्हीवर अख्खा देश फिदा, एअरबॅग्जसह आहेत ‘हे’ दमदार सेफ्टी फिचर्स

Skoda Kylaq कधी लॉंच होणार

कंपनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतात Skoda Kylaq लाँच करणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ही एसयूव्ही अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली जाईल. त्याचवेळी त्याच्या किमतीही जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. तरी लॉंच केल्यानंतर याची सुरुवातीची किंमत सुमारे ८.५० लाख रुपये इतकी असू शकेल, अशी चर्चा आहे. जर मारुती ब्रेझाच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत ८.३४ लाख रुपयांपासून सुरू होते.

Story img Loader