Samrudhhi Mahamarg Speed Limit: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पहाणी केली. या वेळी शिंदे व फडणवीस यांनी एकाच वाहनातून शिर्डीपर्यंतच्या प्रवास केला. या वेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्या वाहनाचेही सारथ्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५३० किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गाची रस्तेमार्गाने पाहणी करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या रस्त्यावरुन प्रवास केला. मात्र या प्रवासामध्ये फडणवीस यांनी नेमक्या किती वेगाने गाडी चालवली? या मार्गावरील वेगमर्यादा किती आहे? यासारखे प्रश्न चर्चेत आहेत.

समृद्धी महामार्गाची रस्तेमार्गाने पाहणी करण्याचे शिंदे-फडणवीस यांनी पूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार फडणवीस शनिवारीच नागपुरात दाखल झाले होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी बरोबर १२.४५ वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील प्रारंभ स्थानाहून (झिरो पॉइंट) शिर्डीकडे प्रवासाला सुरुवात केली. शिंदे आणि फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करीत होते. या वेळी फडणवीस हे स्वत: वाहन चालवत होते, तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. शिंदे तसेच फडणवीस यांनीही या दौऱ्यामधील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केले. अनेक ठिकाणी या दोन्ही नेत्यांचं जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं. हे स्वागत स्वीकारतच या दोन्ही नेत्यांनी पाच तासांचा हा प्रवास पूर्ण केला. फडणवीस यांनीही संभाजीनगरमधील पोखरी येथील एका बोगद्यामधून प्रवास करताना व्हिडीओ ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

Dissatisfaction in Ashok Chavans sphere of influence due to Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्गामुळे अशोक चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात असंतोष, नांदेडमध्ये भाजप उमेदवाराला फटका बसणार?
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Queues at reservation centers due to technical glitch in STs app
एसटीच्या ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आरक्षण केंद्रांवर रांगा

शिंदे-फडणवीस यांच्या या दौऱ्यानंतर अनेकांनी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे स्पीड लिमिटचा म्हणजेच वेगमर्यादेचा. फडणवीसांच्या ट्वीटखालीही अनेकांनी त्यांना वेगमर्यादेसंदर्भात प्रश्न विचारले आहेत.

नक्की वाचा >> उपमुख्यमंत्र्यांनी सारथ्य केलेल्या गाडीचा मालक विक्की कुकरेजा कोण आहे?

काहींनी तर फडणवीस यांनी वाहतुकीचे अनेक नियम मोडल्याचा आरोपही केला आहे.

फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत असलेला हा वेगमार्यादेचे मुद्दा लक्षात घेतला तर फडणवीस यांनी नेमकी किती वेगाने गाडी चालवली हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. विशेष म्हणजे ५०० किमीहून अधिक अंतर फडणवीस आणि शिंदे यांनी पाच तासांमध्ये कापलं. म्हणजेच गाडीचा सरासरी वेग हा १०० किमी प्रति तासाहून अधिक होता. मात्र या प्रवासादरम्यान दोघेही अनेक ठिकाणी सत्कारासाठी आणि स्वागतासाठी थांबले होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करता फडणवीस यांनी नक्कीच गाडी १२० किमीहून अधिकच्या वेगाने चालवल्याचं म्हटलं जात आहे. गाड्यासंदर्भातील वृत्तांकन करणाऱ्या काही वेबसाईट्सने फडणवीसांच्या गाडीचा वेग हा १५० च्या आसपास होता असं म्हटलं आहे. मात्र फडणवीसांच्या गाडीच्या वेगाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी वेग आणि वेळेचं गणित आणि प्रवासादरम्यान घेतलेले थांबे याचा विचार करता नक्कीच फडणवीस सध्या देशात सर्वाधिक वेगमर्यादा निश्चित केलेल्या १२० किमी प्रति तास या वेगापर्यंत पोहचले असं म्हणता येईल.

नक्की वाचा >> काय त्या गाड्या… काय त्यांचा वेग!; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची एकच चर्चा

समृद्धी’वर वेगमर्यादा किती?
समृद्धी महामार्गावर सर्वसामान्यांनाही फडणवीस यांनी ज्या वेगाने गाडी चावली तशी चालवता येईल का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सध्याच्या नियमांनुसार अशा मोठ्या एक्सप्रेसवे आणि महामार्गांना सर्वाधिक वेगमार्यादा ही १२० किमी प्रति तास अशी असते. या महामार्गाचं बांधकाम करणाऱ्या एमएसआरडीचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या माहितीमध्ये वेगमर्यादेसंदर्भात भाष्य केलं होतं. “या महामार्गाची रचना ही १५० किमी प्रति तास वेगाने गाड्या धावण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यामध्ये रस्ता, वळणं, पूल यासारख्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. या ठिकाणीही (वळणं, पूल) वेगमर्यादा १५० पर्यंत ठेवता येईल अशी या मार्गाची रचना आहे. मात्र जेव्हा हा महामार्ग सुरु होईल तेव्हा वेगमर्यादा ही १२० किमी प्रति तास इतकी असेल,” असं गायकवाड म्हणाले होते. गायकवाड यांची संपूर्ण मुलाखत पाहा…

दरम्यान, या महामार्गावर सुरक्षेसंदर्भात विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून २४ तास काम करणारी हेल्पलाइन अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.