देशातली प्रमुख कार कंपनी होंडा कार्सने आपल्या वाहनांची एप्रिल महिन्यात झालेल्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. वाहन उत्पादक कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेडला एप्रिल महिन्यात तोटा सहन करावा लागला आहे. आकडेवारीनुसार, कंपनीची देशांतर्गत विक्री १३ टक्क्यांनी घसरून ७,८७४ युनिट्सवर आली आहे. एका निवेदनात, एचसीआयएलने एप्रिल २०२२ मधील विक्रीचे आकडे जाहीर केले आणि सांगितले की, एका वर्षापूर्वी याच कालावधीत त्यांनी ९,०७२ वाहनांची विक्री केली होती.

कंपनीची निर्यात एप्रिल २०२१ मध्ये ९७० युनिट्सवरून गेल्या महिन्यात २,०४२ युनिट्सपर्यंत वाढली. एचसीआयएलचे संचालक युईची मुराता यांनी सांगितलं की, “ग्राहक स्तरावर मागणी आहे, परंतु पुरवठा साखळी समस्या वाहन उद्योगासाठी एक आव्हान आहे, ज्यामुळे वाढत्या मागणी पूर्ण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. पुरवठा साखळीतील अडथळे लवकरच दूर होतील आणि मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोल साधला जाईल. होंडा सिटी ई-हायब्रीड मॉडेलला बाजारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावरून हे दिसून येते की इलेक्ट्रिक हायब्रीड मॉडेलचे मुख्य वाहन बाजारपेठेत स्थान आहे. आम्ही हे मॉडेल ४ मे रोजी लाँच करणार आहोत.”

Top 3 Mid Size SUV: कमी किमतीत स्टाईल आणि फिचर्ससह चांगल्या मायलेज देणाऱ्या मिड साइज एसयूव्ही

होंडा सिटी हायब्रिड ही आता देशातील सर्वात इंधन कार्यक्षम मध्यम आकाराची सेडान बनली आहे. एका लिटर पेट्रोलमध्ये २६.५ किमी मायलेज देते. मायलेज पाहिल्यास होंडाची ही नवी कार मारुतीच्या सेलेरियोशी स्पर्धा आहे. मात्र, लूक आणि आकाराच्या बाबतीत सेलेरियो या नव्या होंडा कारसमोर स्पर्धेत नाही. मारुतीची सेलेरियो ही कार खूपच लहान आहे, तर होंडा सिटीची नवीन हायब्रीड कार दिसायला उत्तम आणि आकाराने मोठी आहे. Honda City e:HEV दोन मोटर्ससह येते. कारमधील १.५ लिटर पेट्रोल इंजिन जनरेटर आणि ट्रॅक्शन मोटरशी जोडलेले आहे. या दोन्ही मोटर्स लिथियम बॅटरीला जोडलेल्या आहेत. त्याची पेट्रोल मोटर ९८ बीएचपी पॉवर आणि १२७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, इलेक्ट्रिक मोटर २५३ एनएण पीक टॉर्कसह १०९ बीएचपी पॉवर देते. होंडा सिटी हायब्रिड ०.७३४ किलोवॅटलिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे ज्याचे वजन १४.५ किलो आहे.