Best Used Car in India: भारतात दरवर्षी लाखो नव्या चारचाकी कार्सची विक्री होते. यासोबतच सेकेंड हँड मार्केटमध्ये देखील लाखो गाड्यांची खरेदी विक्री होते. ज्यांचं बजेट कमी आहे, असे लोक सेकेंड हँड किंवा युज्ड कार खरेदी करणं पसंत करतात. अनेकांना कमी बजेटमुळे नवीन कार खरेदी करता येत नाही, मग असे ग्राहक युज्ड (वापरलेली) कार खरेदी करतात. आता नुकतेच जुन्या कार्सशी संबंधित एक अहवाल समोर आला असून यामध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेकंड हँड कारची यादी देण्यात आली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारची सर्वाधिक विक्री करण्याच आली आहे.

TOIच्या रिपोर्टनुसार, FY22 मध्ये, वापरलेल्या कारचे मार्केट कोरोनापूर्वीच्या स्थितीत पोहोचले आहे. सेकंट हँड कारचे मार्केट FY22 मधील ४.१ दशलक्ष युनिट्सवरून FY27 मध्ये ८.२ मिलियन युनिट्सपर्यंत होण्याची अपेक्षा आहे.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Top 5 Sedan Car
मारुतीच्या ‘या’ सेडान कारला भारतीय बाजारात तुफान मागणी; Amaze अन् Tigor कारलाही टाकलं मागे
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
kalyan passengers marathi news, dombivli kalyan local trains marathi news
सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

(आणखी वाचा : स्वस्तात मस्त! मारुती सुझुकीने बाजारपेठेत लाँच केली सर्वात स्वस्त ७-सीटर कार; दमदार मायलेजसह मिळतील ‘हे’ जबरदस्त फिचर्स )

‘या’ सेकंड हँड गाड्यांना सर्वाधिक मागणी

OLX प्लॅटफॉर्म डेटानुसार प्री-ओन्ड कार सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय UV हे Hyundai Creta, Maruti Brezza, Maruti Ertiga आणि Mahindra XUV500 आहेत. मारुती बलेनो, ह्युंदाई एलिट i20, रेनॉल्ट क्विड, मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ग्रँड i10 या प्री-ओनड सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय लहान कार आहेत. दुसरीकडे, होंडा सिटी ही भारताची आवडती सेडान राहिली आहे.

FY22 मध्ये, ४९ टक्के मागणीसह युटिलिटी वाहनांनी छोट्या कार्स (४५ टक्के) आणि सेडान (३ टक्के) ला मागे टाकले आहे. याच कालावधीत, मोठ्या (८ टक्के ते ३ टक्के) आणि लहान (६५ टक्के ते ४५ टक्के) कारच्या वार्षिक विक्रीतही घट झाली आहे