Strong performance of Tata Motors, so many cars sold in one month | Loksatta

टाटा मोटर्सची दमदार कामगिरी! एका महिन्यात विकल्या ‘इतक्या’ कार; आकडा वाचून व्हाल दंग…

भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससाठी सध्या उत्तम काळ सुरू आहे. ती वाहन सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. नुकतेच या कंपनीने सप्टेंबर महिन्यात दमदार कामगिरी केली आहे.

टाटा मोटर्सची दमदार कामगिरी! एका महिन्यात विकल्या ‘इतक्या’ कार; आकडा वाचून व्हाल दंग…
Pic Credit-File Photo

भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससाठी सध्या उत्तम काळ सुरू आहे. ती वाहन सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. या कंपनीची चांगलीच चर्चा देखील आहे. नुकतेच या कंपनीने सप्टेंबर महिन्यात ४७ हजार कार विकल्या आहेत. यामध्ये नेक्सॉन, टाटा पंच  आणि टियागो ईव्ही सारख्या कार्सचा समावेश आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, नेक्सॉन आणि पंचच्या विक्रमी विक्रीमुळे कंपनीने गेल्या महिन्यात ४७ हजार ६५४ ची मासिक विक्री गाठली. ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात पुरवठ्यात सुधारणा होऊन किरकोळ विक्री आणखी मजबूत होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. कंपनीने सांगितले की, देशांतर्गत बाजारपेठेत त्यांच्या व्यावसायिक वाहनांची डिस्पॅच गेल्या महिन्यात ९ टक्क्यांनी वाढून ३२,९७९ युनिट्सवर गेली होती, जी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ३०,२५८ युनिट्स होती.

आणखी वाचा : पुन्हा एकदा टोयोटा कारच्या ग्राहकांना दणका; ‘या’ लोकप्रिय कारच्या वाढल्या किंमती, जाणून घ्या नवीन किंमती…

सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सची एकूण वाहन विक्री ८०,६३३ युनिट्सवर

सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत टाटा मोटर्सची एकूण वाहन विक्री ८०,६३३ युनिट्सवर नोंदवली गेली, जी सप्टेंबर २०२१ च्या विक्रीपेक्षा ४४ टक्के जास्त होती. गेल्या महिन्यात, आपल्या पिक-अप वाहनांचे नवीन मॉडेल सादर करण्याबरोबरच, कंपनीने इलेक्ट्रिक अवतारात टियागो हॅचबॅक देखील सादर केले.

टाटा टियागो ईव्ही कारची सुरुवातीची किंमत ८.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत ११.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. या किमतीत उपलब्ध होणारी ही देशातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार बनली आहे. Tiago EV बद्दल बोलायचे तर, हे दोन बॅटरी पॅक पर्यायांसह सात प्रकारांमध्ये सादर केले गेले आहे.

टियागो ईव्हीच्या सध्याच्या किमती फक्त दहा हजार युनिट्सचे बुकिंग होईपर्यंत लागू असतील. ग्राहक १० ऑक्टोबरपासून Tiago EV बुक करू शकतील, तर डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होईल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबईत इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचा स्फोट, बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ करा

संबंधित बातम्या

फॅमिलीसाठी किंवा व्यवसायासाठी…, ७ सीटर मारुती Eeco केवळ १ ते २ लाखात, वाचा ऑफर
Hero Destini 125 XTEC स्कूटर लॉन्च, किंमत ७९,९९० रुपये, जाणून घ्या फिचर्स
Kia Sonet आणि Seltos चे अपडेटेड मॉडेल्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
फोर्सने सादर केली दमदार URBANIA VAN, जाणून घ्या आसन क्षमता आणि किंमत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
प्रवीण दरेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा ; मुंबै बँक कथित घोटाळय़ातून नाव वगळले  
ठराविक उद्योजकांना खूश करण्यासाठी प्लास्टिकवरील निर्बंध शिथिलच पर्यावरणप्रेमींचा आरोप
‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती; निती आयोगाच्या धर्तीवरील संस्थेत ठाण्याचे विकासक अजय आशर
डिसेंबर सर्वाधिक थंडीचा महिना; राज्यभर किमान तापमान सरासरीखाली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबच्या ‘नार्को’नंतरची चौकशी तिहार कारागृहात पूर्ण