महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने शुक्रवारी सुप्रो सीएनजी ड्युओ हे पहिले दुहेरी इंधन वाहन सादर केले. सुप्रो सीएनजी ड्युओ ग्राहकांना दर्जेदार वहन क्षमता, चांगले मायलेज आणि सर्वोत्तम कामगिरीसह, जास्त नफा मिळवून देते, असा दावा कंपनीने केला आहे.
सुप्रो सीएनजी ड्युओ या गाडीची किंमत ६.३० लाख रुपयापासून सुरू (एक्स शोरूम पुणे)
हेही वाचाः Mercedes-Benz G 400d भारतात झाली लॉन्च; खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ कोटी
सुप्रो सीएनजी इयुओद्वारे कंपनी दुहेरी इंधन क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यातून वाहनमालक व चालकांना येणारा खर्च कमी होईल. गाडीची वहन क्षमता ७५० किलो असून, इंधन टाकीची क्षमता ७५ लिटर आहे.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.