scorecardresearch

Sushant Singh Rajput’s Car: सुशांतची ‘ही’ आवडती लक्झरी कार पाहताच, चाहते म्हणाले, “तू नेहमीच…” Video Viral

या कारचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण येत आहे.

Sushant Singh Rajputs Car
सुशांतची आवडती लक्झरी कार पाहून चाहते भावूक (Photo-Social Mediaसंग्रहित छायाचित्र)

Sushant Singh Rajput Range Rover Car: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्यात नक्कीच नाही. पण या अभिनेत्याचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनत आहे. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजही चाहते सुशांतला विसरू शकत नाहीत. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतची आवडती पांढरी रेंज रोव्हर कार दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतची आठवण झाली आहे.

सुशांत सिंह राजपूतची आवडती कार दिसली घरी

इन्स्टंट बॉलीवूडने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीनतम व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत सिंह राजपूतची पांढऱ्या रंगाची MH02GD4747 कार स्पष्टपणे दिसत आहे. सुशांत सिंह राजपूतचे हे वाहन त्याच्या पटणा येथील घरी दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, सुशांतचा फोटो कारच्या शेजारी असलेल्या टेबलवर ठेवण्यात आला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या कारचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण आली आहे.

(हे ही वाचा : Maruti-Mahindra चा खेळ संपणार, टाटा आणतेय देशातील सर्वात सुरक्षित कार, सेफ्टीत तडजोड नाही!)

येथे पाहा व्हीडीओ

चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूतच्या या कारचा व्हिडीओ पाहून चाहते सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, सुशांत सिंह राजपूत आमच्यासोबत नाही यावर आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही. दुसर्‍या युजरने कमेंट केली आहे की, हे जग खूप घाणेरडे आहे, ते कोणालाही आनंदी आणि यशस्वी पाहू शकत नाही, अशी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 16:38 IST