Car Full Forms: साधारणपणे कोणताही भारतीय ग्राहक नवीन वाहन खरेदी करताना त्या वाहनाचं मायलेज आणि किंमतीचा खूप विचार करतो. तसेच हल्ली फीचर्स आणि सेफ्टी फीचर्सचा देखील विचार केला जाऊ लागला आहे. परंतु तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर त्याचे अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे, असं वाटत नाही का? तुम्ही कधी कार खरेदी करताना SUV, XUV, MUV आणि TUV यातील फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय कां? या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या या लेखातून तुमच्या प्रश्नाची उत्तरे..

SUV, XUV, MUV आणि TUV कोणती ठरेल तुमच्यासाठी बेस्ट

  • एसयूव्ही (SUV) मध्ये काय आहे खास?

भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. याला स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (Sport Utility Vehicles) म्हणून ओळखले जाते. त्याच्या नावावरून तुम्ही स्पष्टपणे समजू शकता की ही कार साहसी, खेळांशी निगडित क्षमतेसह आहे. या वाहनांमध्ये रस्त्यावरून चालविण्याची क्षमता देखील आहे, त्याशिवाय त्यांचे ग्राउंड क्लीयरन्स देखील इतर वाहनांपेक्षा बरेच चांगले आहे. ही कार खास स्पोर्ट्स कार लक्षात घेऊन डिझाइन केलेली आहे. या वाहनाची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते खडबडीत रस्त्यांवरुनही चालवू शकतो. आजकाल मायक्रो एसयूव्ही, मिड एसयूव्ही आणि फुल एसयूव्हीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

(हे ही वाचा : Tyre Tips: कार-बाईक चालवताय, रस्त्यावर सुसाट धावणार तुमची वाहने, ‘या’ टायर्सबद्दल माहितेय का? वाचा सविस्तर )

  • एमयूव्ही (MUV) मध्ये काय आहे खास?

MPV म्हणजे (Multi Utility Vehicle) या वाहनांचा वापर तुम्ही अनेक प्रकारच्या कामांसाठी करू शकता हे तुम्हाला त्याच्या नावावरून समजले असेल. या वाहनांची रचना अधिक सामान अन अधिक लोक बसतील अशाप्रकारे करण्यात आली आहे. साधारणपणे, भारतीय बाजारपेठेत एमपीव्ही पाच सीटर आणि सात सीटरमध्ये येते. ही कार अधिक सामान, वजन आणि माणसे वाहून नेण्यासाठी वापरू शकता. MUV कारच्या ऑन रोड परफॉर्मन्सबद्दल बोलायचे तर ते खूप चांगले आहे. हे मोठ्या कुटुंबांसाठी खूप फायदेशीर आहे.

  • एक्सयूव्ही (XUV) मध्ये काय आहे खास?

ज्याप्रमाणे बाजारपेठेत MPV आणि SUV कारची मागणी आहे. त्याचप्रमाणे XUV कारचीही मोठी डिमांड आहे. XUV ही कार आकाराने मोठी असते. (Crossover utility vehicle) या कारची बिल्ड क्वालिटीही खूप चांगली आहे. या कारला तुम्ही एक प्रकारे मोठी SUV कार देखील म्हणू शकता. कारण XUV मधील बहुतेक फीचर्स हे SUV सारखेच असतात. मात्र, या कारची बाह्य रचना अतिशय मजबूतरित्या तयार केलेली असते. कौटुंबिक सहलीसाठी किंवा लांब प्रवासासाठी ही कार अधिक चांगली ठरु शकते.

(हे ही वाचा : Car Tips: प्रवास होईल कमी पैशात; फक्त ‘या’ चार टिप्स फाॅलो करुन वाढवा तुमच्या CNG कारचे मायलेज!)

  • टीयूव्ही (TUV) मध्ये काय आहे खास?

TUV ही कार XUV सारखीच असते. TUV ला टफ युटिलिटी व्हेईकल (Technischer Überwachungsverein) असे संबोधले जाते. ही कार XUV पेक्षा आकाराने थोडी लहान असते. या कारला तुम्ही मिनी एसयूव्ही म्हणूनही वापरु शकता. लहान कुटुंबासाठी TUV हा चांंगला पर्याय आहे. यातील फीचर्सही जबरदस्त असतात.

वरील माहितीच्या आधारे आता तुम्ही ठरवा तुमच्यासाठी कोणती कार असेल खास.