सुझुकी कंपनीच्या टू व्हिलर या खूप प्रसिद्ध आहेत. ये कम पिता है ही यांची टॅगलाईन आहे. अनेक नवनवीन मॉडेल्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी बाजारात लाँच करत असते. सध्या बाजारामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणाऱ्या स्कुटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या मागणीचा विचार करता कंपन्यांनी बाजारामध्ये ब्लूटूथ आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या स्कूटर लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या गाड्यांपैकी Suzuki Access 125 Blutooth ही एक गाडी आहे. ही गाडी तिच्या डिझाईन, फीचर्स आणि मायलेजसाठी ओळखली जाते. जर तुम्हाला सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ ब्लूटूथ ही गाडी विकत घ्यायची असेल तर , या गाडीचे फीचर्स , किंमत आणि मायलेजबद्दल आपण जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Suzuki Access 125 Bluetooth चा काय आहे फायनान्स प्लॅन ?

ही गाडी खरेदी करण्यासाठी काही फायनान्स प्लॅनदेखील आहेत. या पालनाचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन फायनान्स प्लॅनमध्ये जर तुमच्याकडे १२,००० रूपये असतील तर तुम्हाला बँकेतून या स्कुटरसाठी ९२,५९० रुपयांचे कर्ज देऊ शकते. तसेच बँक या रकमेवर ९.७ टक्के वार्षिक व्याजदर लागू करू शकते.

हेही वाचा : Honda Activa H Smart ‘की- लेस’ फीचर्ससह झाली लाँच; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

एकदा तुम्हाला कर्ज मिळाले कि तुम्हाला १२,००० रुपये डाऊन पेमेंट म्हणून भरावे लागणार आहेत. त्यानंतर तुमहाला तीन वर्षांसाठी दरमहा २,९७५ रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

काय आहेत फीचर्स ?

Suzuki Access 125 या स्कूटरमध्ये १२४ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन येते. हे इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले असून हे इंजिन ८.७ पॉवर अणि १० एनएम इतके पीक टॉर्क जनरेट करते. एका लिटरमध्ये ही स्कुटर ५७ किलोमीटर धावू शकते असा सुझुकीचा दावा आहे.

Suzuki Access 125 Bluetooth ची किती आहे किंमत ?

या स्कुटरची (एक्स -शोरूम) किंमत ही ८७,५०० रूपये असून व रोड याची किंमत १,०४,५९० रुपयांपर्यंत जाते. थोडक्यात ही स्कुटर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे १,०४,००० रुपये असणे आवश्यक आहे. फायनान्स प्लॅनमुळे तुम्ही केवळ १२,००० रुपयांत स्कुटर घरी नेऊ शकणार आहात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suzuki suzuki access 125 bluetooth scooter launched in market with attractive features tmb 01
First published on: 26-01-2023 at 12:21 IST