scorecardresearch

Premium

Car Sales in May 2023: देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० गाड्यांमध्ये एकट्या मारुतीच्या ‘या’ सात कार्स

मे महिन्यात कार कंपन्यांनी विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

top best seeling cars may 2023
मे २०२३ मधील टॉप १० बेस्ट सेलिंग कार्स (Image Credit- Financial Express)

10 Best Selling Cars in May 2023: देशामध्ये सध्या अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत. त्यामध्ये मारूती सुझुकी, ह्युंदाई , टाटा मोटर्स, किया एमजी मोटर्स आणि अन्य अशा कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वच कंपन्यांनी मे महिन्यातील आपल्या युनिट्सच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. सर्व कंपन्यांनी मिळून पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण ३,३४,८०० युनिट्सची विक्री केली आहे. यामध्ये मारूती सुझुकीने चांगले प्रदर्शन केले आहे. मे महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या १० कार्समध्ये मारूतीच्या ७ गाड्यांचा समावेश होता. ह्युंदाई मोटर्सची एक तर टाटा मोटर्सच्या २ गाड्यांचा समावेश आहे.

मे महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या १० गाड्यनामध्ये मारुतीच्या बलेनो, स्विफ्ट, वॅग्नर, ब्रिझा, इको आणि डिझायर व अर्टिगा या गाड्यांचा समावेश आहे. तर ह्युंदाईच्या क्रेटा आणि टाटा मोटर्सच्या Nexon आणि पंच या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची मे महिन्यामध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. या बाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हेही वाचा : BS6 फेज २ नुसार Renault ने सुरू केली ‘या’ दोन एसयूव्हींची डिलिव्हरी; ६२५ लिटरचा बूट स्पेस आणि…

मारूतीने बलेनो कारच्या १८,७०० युनिट्सची विक्री केली होती. ही सर्वाधिक विक्री होणारी गाडी आहे. त्यानंतर स्विफ्टच्या १७,३०० आणि वॅग्नरच्या १६,३०० युनिट्सची विक्री केली होती. मे महिन्यात कंपनीच्या विक्रीमध्ये दहा टक्के वाढ दिसून आली आहे. भारतातील मोठी कार उत्पादक असणाऱ्या कार कंपनीने मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण १,७८,०८३ वाहनांची विक्री केली आहे. ज्याची संख्या मे २०२२ मध्ये १,६१,४१३ इतकी होती. 

ह्युंदाई क्रेटाच्या १४,४४९ युनिट्स, नेक्सॉनच्या १४,४२३ युनिट्स आणि त्यानंतर ब्रिझाच्या १३,३९८ युनिट्सची विक्री झाली आहे. मारूतीच्या Eeco गाडीच्या १२,८०० युनिट्सची तर डिझायरच्या ११,३०० युनिट्सची विक्री मे २०२३ मध्ये झाली आहे. तसेच मे २०२३ मध्ये टाटाच्या पंच गाडीच्या ११,१०० युनिट्सची विक्री झाली आहे. मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० गाड्यांच्या यादीमध्ये अर्टिगाने १०,५०० युनिट्सची विक्री झाली आहे.

Car Sales in May 2023: मे महिन्यात कारच्या विक्रीत विक्रमी वाढ, ‘या’ कंपनीने विकल्या सर्वात जास्त गाड्या

मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० कार्स

मारूती सुझुकी Baleno – १८,७०० युनिट्स
मारूती सुझुकी Swift – १७,३०० युनिट्स
मारूती सुझुकी WagonR – १६,३०० युनिट्स
ह्युंदाई मोटर्स Creta -१४,४४९ युनिट्स
टाटा मोटर्स Nexon – १४,४२३ युनिट्स
मारूती सुझुकी Brezza – १३,३९८ युनिट्स
मारूती सुझुकी Eeco – १२, ८०० युनिट्स
मारूती सुझुकी Dzire – ११,३०० युनिट्स

मे महिन्यात कार कंपन्यांनी विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. Maruti Suzuki कंपनीने वाहनांच्या विक्रीत दहा टक्के वाढ नोंदवली आहे. याशिवाय Bajaj Auto, kia, Hyundai कंपनीच्या विक्रीतही वाढ दिसून आली आहे. Financial Expressने दिलेल्या वृत्तानुसार मे महिना कार कंपन्यांसाठी खूप फायदेशीर ठरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×