Car Maintenance: भारताच्या बहुतांश भागातील हवामानात गारवा निर्माण झाला आहे. अनेक जण थंडीच्या या दिवसांमध्ये भटकंती करायला जातात. फिरायला जाण्यासाठी अनेक जण आपल्या चारचाकी वाहनाचा वापर करतात. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का थंडीच्या काळात गाडी चालवणे हे अनेक बाबतीत धोकादायक असते आणि थंड वातावरणात गाडी चालवण्यासाठी गाडीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

थंडीत कारची काळजी

तपासणी करा

fog shocking accident video
कडाक्याची थंडी, दाट धुकं अन् भयंकर अपघात! एकमेकांवर आदळल्या अनेक गाड्या; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Loksatta viva Cultural significance of Makar Sankrant Fashion food
ढील दे ढील दे रे भैय्या
Smart Driving Tips To driving in fog
Smart Driving Tips : हिवाळ्यात विंडशिल्डवरील धुके कसे काढाल? मग ही वाचा सोपी ट्रिक; प्रवास होईल सुरक्षित
Girlfriend write message for boyfriend on 50 Rs Note goes Viral on social media
PHOTO: “तुझा पैसा नको प्रेम हवं, तू बसच्या मागे…” तरुणीनं ५०च्या नोटेवर बॉयफ्रेंडसाठी लिहला खतरनाक मेसेज; वाचून पोट धरुन हसाल
Second Hand Bike tips
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या

थंडीच्या काळात विनाअडथळा आणि सुरक्षित गाडी चालवण्यासाठी अधिकृत सेवा केंद्रातून प्रशिक्षित आणि योग्य पात्रतेच्या तंत्रज्ञांकडून गाडीची तपासणी करून घ्या. कार्यशाळेत गाडीची तपासणी करून घेत असताना तुम्ही विंडशिल्ड पॉलिशिंग, हेड लाइट रिस्टोरेशन, सायलेन्सर कोटिंग, अंडरबॉडी ट्रीटमेंट अशा काही मूल्यवर्धित सेवांचा लाभही घेऊ शकता, ज्यामुळे विशेषतः थंडीच्या काळात गाडी चालवणे अधिक सुकर बनेल.

टायरची तपासणी करा

टायरमध्ये हवेचा दाब नेहमीच शिफारस केलेल्या पातळीइतका ठेवा, नियमित अंतराने व्हील अलाइनमेंट करा आणि खराब झालेले टायर वेळेवर बदला.

इंजिन ऑइलची तपासणी

तेलाची पातळी खूप कमी नसेल याची काळजी घ्या आणि त्यात सातत्य ठेवा. गाडीने सर्वोत्तम कामगिरी करावी, यासाठी गाडीच्या उत्पादक कंपनीने शिफारस केलेल्या तेलाचाच वापर करत आहात, याची व्हेईकल ओनर्स मॅन्युअल वाचून खात्री करून घ्या.

वायपर्सची तपासणी

वायपरमुळे विंडस्क्रीनवर पाण्याचे डाग अथवा पाण्याची रेषा मागे राहात नाही ना, याची खात्री करण्यासाठी वायपरच्या पातीची तपासणी करा. जर या दोन्हीपैकी एक गोष्ट होत असेल तर वायपर बदलण्याची वेळ आली आहे, कारण पावसाळ्याच्या मौसमात तुम्हाला दररोज वायपर वापरावे लागतात. त्याचबरोबर वायपरसाठीची पाण्याची नलिका नेहमी पूर्णपणे भरलेली असेल, याचीही खबरदारी घ्या.

हीटर युनिटची तपासणी (एचएव्हीसी)

थंडीने पूर्णतः ताबा घेण्याच्या आधीच गाडीतील हीटर युनिट योग्यरित्या काम करत आहे की नाही, याची तपासणी करून घ्या. याच माध्यमातून विंडशिल्डवर जमा होणाऱ्या दवबिंदूंना वितळवण्याचेही काम केले जात असल्यामुळे गाडी चालवताना समोरचे योग्यरित्या व सुस्पष्ट दिसावे, यासाठी याची तपासणी अवश्य करून घ्या. थंडीच्या काळात धुरक्याचा (धुके आणि धूर यांचे मिश्रण) त्रास होऊ नये, यासाठी एसीच्या फिल्टरची तपासणी करा.

हेही वाचा: CNG चे कारचालक आहात? ‘या’ महत्त्वाच्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या कारची काळजी

बॅटरीची तपासणी

तुमच्या गाडीची बॅटरी योग्यरित्या काम करत आहे की नाही, हे तपासणेही महत्त्वाचे आहे. आवश्यकता असेल तर बॅटरी बदला. मान्सूनच्या काळात लाइट्स, वायपर्स यांसारख्या इलेक्ट्रिकल घटकांच्या वापरावर ताण येतो.

Story img Loader