scorecardresearch

फक्त १९ हजार देऊन घरी घेऊन जा Yamaha R15 V4 स्पोर्ट्स बाईक; स्टाईलसोबतच मिळतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स

स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमधील प्रीमियम बाईक यामाहा आर१५ ही कंपनीच्या बेस्ट सेलिंग बाईक्सच्या लिस्टमध्ये नेहमीच अव्वल असते.

Yamaha-R15-V4-2
तुम्हालाही ही बाईक आवडत असेल तर तिला खरेदी करण्यासाठी तुम्हाला १.७२ लाख ते १.८२ लाख रुपये खर्च करावे लागतील. (फोटो- YAMAHA)

आपल्या देशातील टू-व्हीलर सेक्टरमध्ये कमी बजेटमध्ये येणारी पण चांगला मायलेज देणाऱ्या बाईकनंतर स्पोर्ट्स आणि क्रूजर बाईक्सना सर्वात जास्त पसंत केलं जातं. यात स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमधील प्रीमियम बाईक यामाहा आर१५ ही कंपनीच्या बेस्ट सेलिंग बाईक्सच्या लिस्टमध्ये नेहमीच अव्वल असते. जर तुम्हालाही ही बाईक आवडत असेल तर ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला १.७२ लाख ते १.८२ लाख रुपये खर्च करावे लागतील. पण जर तुम्ही इतकी मोठी रक्कम एकरकमी भरू शकत नसाल तर अगदी सोप्या डाउनपेमेंटवरही तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता.

टू-व्हीलर सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट www.bikedekho.com वर दिलेल्या डाउनपेमेंट आणि ईएमआयचा विचार करता, जर तुम्ही या यामाहा आर१५ चे डार्क नाईट एडिशन विकत घेणार असाल तर कंपनी तुम्हाला या बाईकवर १,७७,८९८ रुपायांचे कर्ज देईल. यानंतर तुम्हाला १९,७६७ रुपयांचे डाउनपेमेंट करावे लागेल आणि तुम्हाला प्रतिमाह ६,३७१ रुपयांचे ईएमआय भरावे लागेल. बँकेकडून या स्पोर्ट्स बाईकवर मिळणाऱ्या कर्जाची अवधी ३६ महिने ठेवण्यात आली असून कर्जाच्या रकमेवर बँक ९.७% वार्षिक व्याज आकारेल.

KTM 390 आणि BMW G310GSला मिळणार टक्कर; Royal Enfield लवकरच लॉंच करणार अ‍ॅडव्हेंचर बाईक Himalayan 450

यामाहा आर१५ बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकमध्ये सिंगल सिलेंडरचे १५५ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे जे लिक्विड कुल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १८.४ पीएसची पॉवर आणि १४.२ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. यासोबतच ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाईकच्या फ्रंट आणि रिअर व्हीलमध्ये कंपनीने डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले असून यासोबतच ड्युअल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम लावण्यात आले आहे. ही बाईक ५० किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज देते आणि हे मायलेज एआरएआय द्वारे प्रमाणित करण्यात आलं असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2022 at 12:13 IST