scorecardresearch

कारमध्ये बिघाड, कंपनीने केली मनमानी, गुन्हा दाखल होताच ग्राहकाला मिळणार ६० लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ग्राहकाल मिळणार ६० लाख रुपये.

Audi Q7 owner to receive Rs 60 lakh refund
Volkswagen कंपनीला भरावे लागणार 60 लाख रुपये (Photo-financialexpress संग्रहित छायाचित्र)

ऑडी Q7 कारच्या ब्रेकिंग सिस्टीमबाबत समस्या येत असल्यामुळे ग्राहकाने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे याबाबत तक्रार केली. जेथे आयोगाने तपासाअंती कार निर्मात्याची मूळ कंपनी फोक्सवॅगन (Volkswagen) ला वाहनाची संपूर्ण किंमत ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले आहेत आणि या प्रकरणात खर्च केलेली रक्कमही परत करावी, असे फटकारले आहे. कोणत्याही सेवा पुरवठादार कंपनीच्या उत्पादनात दोष आढळल्यानंतर त्यांना सूट देणे योग्य नाही, असे आयोगाने म्हटले आहे. वाहन उत्पादक फोक्सवॅगनला त्यांच्या वाहनाची संपूर्ण किंमत त्यांच्या एका ग्राहकाला परत करावी लागेल. ही रक्कम ६० लाख रुपये आहे.

नेमकं प्रकरण काय?

तामिळनाडूच्या जहानमधील एका व्यक्तीने अनेक वर्षांपूर्वी ऑडी Q7 कार खरेदी केली होती, कंपनीला वाहन आणि केसची रक्कम दोन्ही ग्राहकांना परत करावी लागेल. एका मीडिया रिपोर्टनुसार, ग्राहकाने २००९ मध्ये ऑडी Q7 कार खरेदी केली होती. पण २०१४ मध्ये त्यांना या वाहनाच्या ब्रेकमध्ये अडचण आली. जुलै १०१४ मध्ये कल्लाकुरिची येथे त्यांना या वाहनात ब्रेक सिस्टीममध्ये बिघाडाचा सामना करावा लागला होता. या प्रकरणात न्यायमूर्ती आर सुब्बय्या आणि आयोगाचे सदस्य आर वेंकटसेपेरुमल यांच्या खंडपीठाने ऑडीची मूळ कंपनी फोक्सवॅगनला ग्राहकांना ६० लाख रुपये परत करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. फोक्सवॅगन या प्रकरणात खर्च केलेले ₹२५,००० ग्राहक, Saravana Stores यांना देखील परत करेल.

(हे ही वाचा : Tata च्या ‘या’ इलेक्ट्रिक कारने २.५ वर्षांत केली तब्बल १४ लाख रुपयांची बचत, बॅटरीमध्येही आली नाही अडचण )

अनेक वेळा केली कार दुरुस्ती, तरीही समस्या सुटलेली नाही

सरवण स्टोअर्सने जानेवारी २००९ मध्ये त्यांच्या कंपनीच्या नावावर ऑडी Q7 ३.० TDI क्वाट्रो कार खरेदी केली. २० जुलै २०१४ रोजी, कल्लाकुरीचीजवळ, ब्रेक निकामी झाल्यामुळे त्यांच्या कारला अपघात झाला, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला. अनेक वेळा झालेल्या गडबडीमुळे कार बदलून द्यावी आणि ₹३० लाखांची भरपाई मिळावी, या मागणीसाठी त्यांनी Tamil Nadu Consumer Disputes Redressal Commission कडे तक्रार केली होती. या कारसाठी ग्राहकाने ६० लाख रुपये दिले होते, असे वकील संजय पिंटो यांनी सांगितले. ही कार एकूण ४२,०३६ किमी धावली आहे. त्याच्या सर्व्हिसिंगसाठी २.४ लाख रुपये खर्च झाले आहेत, परंतु तरीही समस्या कायम आहे.

खंडपीठाने नाकारला कंपनीचा युक्तिवाद

या प्रकरणी कंपनीने कोर्टात सांगितले की, कारमध्ये दुरुस्तीदरम्यान कोणताही दोष आढळला नाही. खंडपीठाने मात्र, कंपनीचा युक्तिवाद नाकारला आणि कार चालान बिले दाखवली. ग्राहकाची कंपनी आणि डीलरने दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी खर्च केलेली लाखो रुपयांची बिले दाखवून ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये भरल्याचे सांगितले. त्याआधारे आयोगाने कंपनीला रक्कम परत करण्यास सांगितले. कारमधील या दोषामुळे ग्राहकाला गंभीर इजा होऊ शकते, असेही म्हणत न्यायालयाने कंपनीला फटकारले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:24 IST