डॉक्टरचा झाला गर्लफेंडशी वाद, अन् रागाच्या भरात 'असं' काही केले जे पाहून तुम्हीही म्हणाल | Tamil Nadus where a doctor who had fight with his girlfriend simply set his Rs 70 lakh Mercedes Benz CLA 45AMG luxury car on fire | Loksatta

डॉक्टरचा झाला गर्लफ्रेंडशी वाद, अन् रागाच्या भरात पेटवली ७० लाखाची ‘ही’ लक्झरी कार

रागाच्या भरात कोण काय करेल आणि कसा वागेल याचा काही नेम राहिलेला नाही. आता या डॉक्टरने बघा…

Car on fire
Mercedes Benz CLA 45AMG लक्झरी कार पेटवली (Photo-संग्रहित छायाचित्र)

अनेक वेळा लोक रागाच्या भरात काय करतील काही सांगता येत नाही. ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. रागाच्या भरात लोकांचा आरडाओरडा आणि भांडण तुम्ही ऐकले असेलच, पण नुकतीच एका व्यक्तीने रागाच्या भरात आपली ७० लाखांची कार जाळल्याची माहिती समोर आली आहे.

Mercedes Benz CLA 45AMG लक्झरी कारला लावली आग

तमिळनाडूतील कांचीपुरम येथून एका डॉक्टरने रागाच्या भरात आपली कार पेटवून दिली आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या २८ वर्षीय डॉक्टरने आपल्या प्रेयसीसोबत काही कारणावरुन भांडण झाल्याने कार पेटवून दिल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, ही कार Mercedes Benz CLA 45AMG लक्झरी कार होती, ज्याची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे.

रिपोर्ट्सनुसार, २८ वर्षीय डॉ. कविनने कांचीपुरममधील एका खासगी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले होते. कविन त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २८ वर्षीय महिला डॉक्टरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. गेल्या आठवड्यात कविनने त्याच्या मैत्रिणीला कारमधून फिरायला नेले होते.

(हे ही वाचा : Mahindra Thar आता ५ लाखात आणा घरी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त डील )

पेट्रोल टाकून लक्झरी कार पेटवली

काही वेळाने कविन एका वर्दळ नसलेल्या ठिकाणी पोहोचला होता. पण याच दरम्यान कविन आणि त्याच्या मैत्रिणीमध्ये काही मुद्द्यावरून वाद सुरू झाला. परिस्थिती इतकी बिघडली की वाटेत गाडी थांबवून दोघे बाहेर आले आणि भांडायला लागले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कविनला इतका राग आला की त्याने कारमधील पेट्रोल टाकून ती लक्झरी कार पेटवून दिली. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये कार जळताना दिसत आहे.

कारमधून धूर निघत असल्याचे पाहून स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. कांचीपुरम तालुका पोलिसांनी कविनविरुद्ध त्याच्या कारला आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 19:43 IST
Next Story
Mahindra Thar आता ५ लाखात आणा घरी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त डील