Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदके जिंकल्यानंतर मनू भाकेरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. आता टाटा मोटर्सकडून मनू भाकेरला नुकतीच लाँच झालेली टाटा कर्व ईव्ही भेटस्वरुप दिली आहे. TATA.ev ने अधिकृत एक्स अकाउंटवरून या संदर्भात माहिती दिली. या एक्स पोस्टमध्ये लिहिलेय, “ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू पहिली एसयूव्ही कूप तिच्या घरी घेऊन गेली! या WorldEVDay निमित्त मनू भाकेर ला Curvv.ev भेट म्हणून देताना आम्हाला अभिमान वाटतोय.” (tata ev gifted Curvv ev SUV electric car to the Indias first athlete Manu Bhaker to win double medals at the Olympics)

टाटा मोटर्सने मनू भाकरला ही खास भेट एका खास ठिकाणी दिली टाटा मोटर्सने ही एसयूव्ही टाटा मोटर्सच्या पहिल्या EV स्टोअरमध्ये दिली. हे स्टोअर गुरुग्राम येथील सेक्टर १४ येथे आहे. Tata.ev ने एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोमध्ये मनू भाकेर नवीन इलेक्ट्रिक कारच्या चाव्या घेताना दिसत आहे. यावेळी तिचे आई वडील सुद्धा उपस्थित होते.

हेही वाचा : No Objection Certificate (NOC) : गाडी विकायची आहे? मग आरटीओकडून एनओसी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या, ऑनलाइन अन् ऑफलाइन प्रक्रिया

आज आपण मनू भाकेर ला मिळालेल्या Curvv.ev ची किंमत व फीचर्सविषयी जाणून घेणार आहोत. (know price and features of Curvv.ev electric car)

Tata Curvv EV ची किंमत

कंपनीने १७.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह Tata Curve EV बाजारात लाँच केली आहे. या कारचे टॉप मॉडेल २१.९९ लाख रुपयांचे आहे.

बॅटरी व ड्रायव्हिंग रेंज

Curvv EV ला दोन बॅटरी पॅकचे पर्याय दिले आहे. त्यापैकी पहिला ४५ kWh आणि दुसरा ५५ kWh आहे. पहिला बॅटरी पॅक मिड-रेंजचा असतो तर एका चार्जवर ५०२ किमी रेंज प्रदान करते. दर दुसरा बॅटरी पॅक ५८५ किमीची रेंज ऑफर करतो.

हेही वाचा : Top 5 best-selling cars in August : २५ किमी मायलेज अन् ८.३४ लाख किंमत; मारुतीच्या ‘या’ कारने देशाला लावले वेड Creta आणि Punchला 

फीचर्स आणि सुरक्षा

Tata Curve EV च्या या टॉप-स्पेक मॉडेलमध्ये ९ स्पीकर JBL साउंड सिस्टिम, पॅनोरॅमिक सनरूफ, १२.३ इंच टचस्क्रीन आणि १०.२५ इंच ड्रायव्हर डिस्प्लेचा समावेश आहे. यात सहा एअरबॅग्ज, ३६० डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-२ ADAS सूट सारखे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे फीचर्स आहेत.