Tata Indica to make a comeback in India?: नव्वदच्या दशकात टाटा मोटर्सने आपली परवडणारी हॅचबॅक टाटा इंडिका (Tata indica) ही देशातील पहिली डिझेल कार म्हणून लॉन्च केली होती. टाटाच्या ज्या कारने टाटाला भारतात एक वेगळी ओळख दिली, ती कार पुन्हा एकदा लाँच होऊ शकते, अशी माहिती आहे. ‘Tata Indica’ पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार, अशी शक्यता आहे.

मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, टाटा आपली गोल्डन एज ​​कार पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, तसेच तिचे दोन प्रकार लॉन्च केले जातील, पहिले इंडिका क्लासिक नावाने आणि दुसरे इंडिका स्पोर्ट्सच्या नावाने, क्लासिक मॉडेलमध्ये कोणताही बदल दिसणार नाही. उलट, या प्रकाराचा प्लॅटफॉर्म देखील बदलला जाणार नाही. पण जर आपण स्पोर्ट्सबद्दल बोललो तर कंपनी या मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. ज्यामध्ये प्लॅटफॉर्म ते इंटीरियरचा समावेश आहे, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

Indica Classic डिझाईन

क्लासिकमध्ये फारसे बदल दिसणार नाहीत, पण हो, तुम्ही हेडलाइटला थोडा कर्व्ही लुक दिला जाऊ शकतो. दुसरीकडे, या कारमध्ये, आपण बंपरमध्ये काही बदल देखील पाहू शकता, मागील लूकबद्दल बोलायचे तर, यामध्ये अमेरिकन फीचर्ससह लाइट्स वापरल्या जाऊ शकतात. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. इंटीरियरमध्‍ये आणखी बदल पाहायला मिळणार आहेत, ज्यात एसी व्हेंटची पोझिशन आणि स्टार्ट स्टॉप बटण यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा : Scorpio वर भारी पडली महिंद्राची ‘ही’ स्वस्त ७ सीटर कार, परफॉर्मन्सही दमदार, किंमत फक्त… )

Indica Sports डिझाईन

जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा असेल तर हे मॉडेल पूर्णपणे रीडिझाइन केले जात आहे, अगदी त्याचे प्लॅटफॉर्म देखील बदलले जाईल. इतकेच नाही तर त्याचा संपूर्ण लुक देखील बदलला जाईल, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की त्याचे एक्सटीरियर बदलण्यासाठी हे डिझाईन जग्वारकडून घेण्यात आले आहे. या दोन्ही कारच्या किमतीत फारसा बदल होणार नाही. या दोन्ही कार एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असतील. या गाड्या थेट मारुतीच्या वॅगनार आणि सेलेरिव्होशी टक्कर देतील, असे मानले जात आहे.