टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कारची विक्री करते. टाटा मोटर्सच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. दर महिन्याला सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत नेहमीच टाटाच्या कारचा समावेश असतो. सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जाते. आता बाजारपेठेत टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे. कारण टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार आता नव्या अवतारात देशात दाखल होणार आहे.

टाटा मोटर्सच्या एंट्री लेव्हल वाहनांमध्ये पंच ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ही कार सीएनजी आणि इलेक्ट्रिक इंजिनमध्ये देखील येते, ज्यामुळे या कारची किंमतही कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या कारचे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच नवीन आवृत्ती चाचणी दरम्यान दिसून आली आहे. असे सांगितले जात आहे की, हे नवीन अपडेटेड व्हर्जन नोव्हेंबर २०२४ मध्ये लाँच केले जाऊ शकते. सध्या कंपनीने याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

(हे ही वाचा: बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ स्कूटी )

या नव्या कारच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचा अंदाज आहे. कारच्या बाहेरील भागात काही बदल केले जाऊ शकतात. कारच्या फ्रंट ग्रिल, हेडलाइट आणि टेललाइटच्या स्टाइलमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. या कारची किंमतही कमी असू शकते. जर आपण आकडेवारी पाहिली तर मे २०२४ मध्ये टाटा पंचच्या एकूण १८,९४९ युनिट्सची विक्री झाली. बाजारात ही कार Hyundai Exter, Maruti Fronx, Maruti Ignis आणि Citroen C3 सारख्या वाहनांशी स्पर्धा करते.

टाटा पंच सिटी आणि इको या दोन ड्रायव्हिंग मोडसह येतो, सिटीवर कार हाय पॉवर जनरेट करते आणि इकोमध्ये हायवेवर जास्त मायलेजला सपोर्ट करते. या कारला हायस्पीडसाठी ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारचा टॉप स्पीड १४० किमी प्रतितास आहे, ही कार केवळ ९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवते. कारमधील उच्च कार्यक्षमतेसाठी, ८८ PS ची शक्ती आणि ११५ Nm टॉर्क जनरेट केला जातो. ग्लोबल NCAP सेफ्टी क्रॅश टेस्टमध्ये कारला ५ स्टार मिळाले आहेत.

टाटा पंच किंमत आणि मायलेज

कारचे बेस मॉडेल ६.१२ लाख रुपयांचे एक्स-शोरूम आहे.
ही कार CNG व्हर्जनमध्ये ८.२४ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
EV प्रकारची किंमत ११.६६ लाख रुपये आहे.
CNG वर २६.९९ किमी/किलो मायलेज देते.
ही कार पेट्रोलवर १८.८kmpl मायलेज जनरेट करते.