टाटा कंपनीची सीएनजी कार Tiago आणि Tigor लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टाटा मोटर्सने बुधवारी आपल्या सीएनजी कार लाँच केल्या आहेत.

Tata_Tigor
टाटा कंपनीची सीएनजी कार Tiago आणि Tigor लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स (Photo-Tata Motors)

टाटा मोटर्सने बुधवारी आपल्या सीएनजी कार लाँच केल्या आहेत. कंपनीने आपले Tiago आणि Tigor हे मॉडेल iCNG तंत्रज्ञानासह सादर केले आहेत. सीएनजी कार सेगमेंटमध्ये टाटाची लढत मारुती आणि ह्युंदाईसोबत होणार आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत फॅक्टरी फिट सीएनजी कारमध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्सचे वर्चस्व आहे. आता टाटाच्या सीएनजी कार त्यांना कडवे आव्हान देईल. मारुती S-Presso, Celerio, WagonR, Eeco, Alto आणि Ertiga मध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट येते. ह्युंदाईच्या Grand i10 आणि Aura मध्ये सीएनजी आहे.

टाटा मोटर्सचा दावा आहे की दोन्ही कारच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. सीएनजी वाहनांचा विचार करणार्‍या अनेक खरेदीदारांसाठी सुरक्षितता ही मुख्य चिंता असते. लीक प्रूफिंगसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर, बारकोडद्वारे घटक पातळी ट्रेसेबिलिटी आणि गंज रोखणारे घटक यासारखे वैशिष्ट्ये आहेत. गॅस गळती झाल्यास, पेट्रोल मोडवर ऑटो स्विच आहे. टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, आज ऑफर करत असलेल्या सीएनजी मॉडेल्समध्ये पेट्रोलची किमान पातळी असणे आवश्यक आहे. दोन्ही मॉडेल्स थेट सीएनजीवर देखील सुरू होतात. डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेवर पेट्रोल गेज व्यतिरिक्त एक विशेष सीएनजी इंधन गेज आहे. एक विशेष नोजल देखील सीएनजी जलद रि-फिलिंग करण्यात मदत करते. टाटा टियागो एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड प्लस या चार प्रकारात आहे. तर टिगोर एक्सझेड आणि एक्सझेड प्लस प्रकारात आहे. शोरुमध्ये येण्यापूर्वी टियागोच्या एक्सई (६,०९,९००), एक्सएम (६,३९,९००), एक्सटी (६,६९,९००) आणि एक्सझेड प्लस (७५२,९००) रुपये किंमत आहे. तर टिगोरच्या एक्सझेडची (७,६९,९००) आणि एक्सझेड प्लसची (८,२९,९००) रुपये किंमत आहे.

टाटा मोटर्सचा दावा आहे की त्यांच्या सीएनजी कार श्रेणीतील सर्वोत्तम पॉवरसह येतात. कंपनीने १.२ लीटर रेव्होट्रॉन इंजिनवर विकसित केले आहे. हे ७३ पीएसची कमाल पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, Tigao iCNG ची ग्राउंड क्लीयरन्स १६८ एमएम आहे आणि Tigor iCNG ची ग्राउंड क्लीयरन्स १६५ एमएम आहे. डोंगराळ आणि खडबडीत रस्त्यावर गाडी चालवण्याचा चांगला अनुभव देते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata launch cng car tiago and tigor know price and feature rmt

Next Story
Land Rover: महेंद्रसिंह धोनीच्या ताफ्यात नव्या गाडीची एन्ट्री, खरेदी केली विंटेज लँड रोव्हर-३ एसयूव्ही
फोटो गॅलरी