scorecardresearch

टाटाचा मोठा धमाका! देशात दाखल केली दोन CNG सिलिंडर असलेली कार, किंमत उघड, बुटस्पेसही जबरदस्त

कंपनीने बाजारात आणलेली ही तिसरी सीएनजी कार आहे.

Tata Altroz CNG
Tata Altroz CNG च्या किमती समोर (Photo-financialexpress)

Tata Altroz CNG Price: Tata Altroz ​​CNG ची किंमत उघड झाली आहे. Altroz ​​CNG XE, XM+ XM+ (S), XZ, XZ+ (S) आणि XZ+ O (S) सारख्या प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. टाटाच्या या सीएनजी कारमध्ये सेगमेंट फर्स्ट ट्विन सिलिंडर सीएनजी टँकसह सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जर सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. कंपनीने बाजारात आणलेली ही तिसरी सीएनजी कार आहे.

Tata Altroz ​​CNG: पॉवर आणि फीचर्स

Tata Altroz ​​CNG मध्ये १.२-लिटर नैसर्गिकरीत्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी-फिट CNG किट आहे, जे एकत्रितपणे ७३.४PS ची कमाल पॉवर आणि १०३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. Altroz ​​CNG ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह देण्यात आली आहे. मायलेजच्या बाबतीतही ही कार चांगली आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Altroz ​​CNG मध्ये ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्ट, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मागील पार्किंग मिळेल.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त… )

Tata Altroz ​​CNG प्रकाराच्या किमती

Tata Altroz ​​XE CNG व्हेरिएंटची किंमत ७.५५ लाख रुपये आहे

Tata Altroz ​​XM+ CNG व्हेरियंटची किंमत ८.४० लाख रुपये आहे
Tata Altroz ​​XM+ (S) CNG व्हेरियंटची किंमत ८.८५ लाख रुपये आहे
Tata Altroz ​​XZ CNG व्हेरियंटची किंमत ९.५३ लाख रुपये आहे
Tata Altroz ​​XZ+ (S) CNG व्हेरियंटची किंमत १०.०३ लाख रुपये
Tata Altroz ​​XZ+ O (S) CNG व्हेरियंटची किंमत १०.५५ लाख रुपये

या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या