Tata Motors Car Company is going to increase the price of its vehicles in 2023 | Loksatta

कार खरेदीचा विचार करताय? मग आताच करा! पुढील वर्षात देशातील ‘ही’ आघाडीची कार कंपनी करणार गाड्यांच्या किमतीत वाढ

Car Price Hike: कार खरेदीचा विचार करताय मग आताच करा. कारण, पुढील वर्षात देशातील ‘ही’ आघाडीची कार कंपनी करणार आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ.

कार खरेदीचा विचार करताय? मग आताच करा! पुढील वर्षात देशातील ‘ही’ आघाडीची कार कंपनी करणार गाड्यांच्या किमतीत वाढ
टाटा मोटर्स पुढील महिन्यात गाड्यांच्या किमतीत वाढ करणार. (संग्रहीत छायाचित्र)

Car Price Hike: तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर हीच उत्तम संधी आहे. कारण येत्या वर्षात देशात आघाडीवर असलेली टाटा मोटर्स कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात टाटा मोटर्सच्या पंच, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.

किमतीत वाढ होण्याचे कारण

पुढील वर्षी १ एप्रिलपासून लागू होणार्‍या कठोर उत्सर्जन नियमांचे पालन केले जावे, नियामक बदलांचा खर्चावर परिणाम होईल, यासाठी प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार सुरु असल्याचे टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले.

तसेच त्यांनी नमूद केले की, बॅटरीच्या किमतीही वाढल्या आहेत पण बाजार आतापर्यंत त्याच्या प्रभावापासून बचावला आहे. जोपर्यंत वस्तूंच्या किमतींचा संबंध आहे, कंपनी काही अवशिष्ट परिणामांच्या आधारे दरवाढीचे मूल्यांकन करत आहे. “बॅटरीच्या किमती आणि नवीन नियमांचा EV बाजूवरही परिणाम झाला आहे.

(आणखी वाचा : Volkswagen ची नवी जबरदस्त SUV भारतीय बाजारपेठेत लाँच! टक्सन, एअरक्रॉसला देणार टक्कर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)

१ एप्रिल २०२३ पासून, वाहनांना रिअल-टाइम उत्सर्जन पातळीचे निरीक्षण करण्यासाठी ऑन-बोर्ड सेल्फ-डायग्नोस्टिक डिव्हाइस असणे आवश्यक आहे. उत्सर्जन पॅरामीटर्सपेक्षा जास्त असल्यास, डिव्हाइस चेतावणी दिव्यांद्वारे सूचित करेल की, वाहन सेवेसाठी सबमिट केले जावे. वाहनांमध्ये प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्टर देखील असतील जे इंधन जळण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी पेट्रोल इंजिनमध्ये इंजेक्ट केलेल्या इंधनाची वेळ आणि प्रमाण नियंत्रित करतील. सेमीकंडक्टरला देखील अपग्रेड करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:48 IST
Next Story
Volkswagen ची नवी जबरदस्त SUV भारतीय बाजारपेठेत लाँच! टक्सन, एअरक्रॉसला देणार टक्कर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत