Tata Motors Car: गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत SUV कारची विक्री सातत्याने वाढत आहे. तसेच या सेगमेंटमध्ये अनेक विभाग आणि नवीन मॉडेल्स आल्याने स्पर्धा आणखी वाढली आहे. भारतातील आघाडीची SUV निर्माता कंपनी टाटा मोटर्स एक महत्त्वाचा टप्पा साजरी करत आहे. कारण कंपनीची टाटा पंच एसयूव्ही ही केवळ ३४ महिन्यांत ४००,००० विक्रीचा टप्पा पार करणारी सर्वात वेगवान एसयूव्ही बनली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेली, टाटा पंच ही एक सबकॉम्पॅक्ट SUV आहे, जी तिच्या बोल्ड डिझाइन आणि उच्च ग्राउंड क्लीयरन्ससाठी ओळखली जाते. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत ६.१३ लाख रुपये आहे.

अवघ्या काही वर्षांतच टाटा पंचने भारतीय बाजारपेठेत स्वत:चे मजबूत स्थान निर्माण केले आहे. सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये पंचने ६८ टक्क्यांनी मार्केट शेअर मिळवला आहे. याशिवाय, सीएनजी व्हेरिएंटच्या सादरीकरणानेही विक्रीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लाँच होण्यापूर्वी, पंचला GNCAP कडून प्रतिष्ठित ५-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त झाले. अशा परिस्थितीत, ते त्या काळापासूनच सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक बनले. ऑगस्ट २०२२ मध्ये, केवळ दहा महिन्यांत १००,००० विक्री गाठणारी ही पहिली SUV ठरली. यानंतर, पुढील नऊ महिन्यांत त्याची विक्री २००,००० पर्यंत पोहोचली आणि पुढील सात महिन्यांत हा आकडा ३००,००० वर पोहोचला.

helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
thermax collaborates with ceres power for green hydrogen production
थरमॅक्सच्या ‘सेरेस’शी भागीदारी; पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती देशात शक्य
bajaj housing finance ipo gets bids worth rs 3 25 lakh crore
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ‘आयपीओ’ला विक्रमी ३.२५ कोटींच्या बोली
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
Duleep Trophy 2024 Dhruv Jurel equaled MS Dhonis record
Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
nse marahti news
जागतिक सकारात्मकतेने निर्देशांक तेजी कायम, ‘सेन्सेक्स’ ८२,३६५ च्या विक्रमी शिखरावर
Maruti Jimny Car Sales Maruti Jimny Got Record Growth Of 5700 Percent In Exports Check Details
Maruti Jimny Car Sales: या कारने विक्रीच्या बाबतीत मोडला रिकॉर्ड; जाणून घ्या किती झाली विक्री

(हे ही वाचा : ना Bajaj Chetak ना TVS iQube, देशातील बाजारपेठेत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरनं केलं सर्वाचं मार्केट जाम, झाली दणक्यात विक्री )

टाटा मोटर्सच्या नाविन्यपूर्ण ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानासह पंच आयसीएनजी सादर करून पंचचे यश कायम राहिले. दरम्यान, त्याच्या पंच EV इलेक्ट्रिक व्हेरियंटने ग्राहकांच्या संख्येचा विस्तार केला आणि एकूण विक्री वाढीस हातभार लावला. या जोडण्यांमुळे बाजारात पंच ब्रँडची उपस्थिती बळकट होण्यास मदत झाली. EV उत्साही लोकांना पंच EV देखील खूप आवडले, ज्यामुळे ब्रँडच्या विक्रीत १५ टक्क्यांची अतिरिक्त वाढ झाली. टाटा मोटर्सच्या शुद्ध ईव्ही आर्किटेक्चरवर सादर करण्यात आलेले हे पहिले वाहन आहे, जे लांब पल्ल्याचे आणि प्रगत तंत्रज्ञान देते.

पंचच्या पेट्रोल प्रकारांचा विक्री ५३ टक्के आहे, त्यानंतर CNG प्रकारांचा ३३ टक्के आणि EV प्रकारांचा १४ टक्के आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील १७.७ टक्के मार्केट शेअर आणि सर्व विभागांमध्ये सर्वाधिक विक्री होणारे वाहन म्हणून पंचचे यश स्पष्ट होते. FY24 मध्ये विक्रीत २७ टक्के वार्षिक वाढ झाली आहे आणि जानेवारी २०२४ ते जून २०२४ पर्यंत ती सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे.