टाटा मोटर्स ही भारतातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीद्वारे निर्मित अनेक कार्संना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्तमोत्तम उत्पादनाच्या बळावर टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांना खुश करण्यासाठी ही कंपनी नेहमी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते. Carindia.com ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या टाटा मोटर्सच्या चारचाकी गाड्यांवर डिस्काउंट दिला जात आहे. पेट्रोल, डिझेल तसेच CNG पॉवरट्रेन श्रेणीतील ज्या कार्सच्या किंमती या डिस्काउंट ऑफरमुळे कमी झाल्या आङेत, त्याची माहिती आम्ही देणार आहोत.

Tata Tiago

टाटा टियागो ही विविध पॉवरट्रेन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या टियागोवर एकूण ३०,००० रुपयांची सूट दिली जाणार आहे. यामध्ये एक्सचेंज डिस्काउंट – १०,००० रुपये आणि ग्राहक योजना (Consumer schemes)-२०,००० यांचा समावेश होतो. तर CNG-Tiago वर ३०,००० रुपयांपर्यंतची ग्राहक योजना सवलत; १०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट आणि ३,००० रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट अशी एकूण ४३ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ

Tata Tigor

टाटा टिगोरच्या पेट्रोल मॉडेलवर ३३,००० रुपयांची सूट दिली जाणार आहे. तसेच CNG वर चालणाऱ्या मॉडेलवर तब्बल ४८,००० रुपयांपर्यंत सूट आहे. या दोन्ही मॉडेल्सच्या डिस्काउंट ऑफर्समध्ये एक्सचेंज ऑफर्स, ग्राहक सवलत योजना आणि कॉर्पोरेट डिस्काउंट्स यांचा समावेश होतो.

आणखी वाचा – मारूती सुझुकीने लॉन्च केली ‘ही’ नवीन Alto; ग्राहकांना सीएनजी आणि पेट्रोल व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येणार

Tata Altroz

टाटा मोटर्सच्या लोकप्रिय अल्ट्रोझ हॅचबॅकच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सवर डिस्काउंट दिला जात आहे. पण काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या Tata Altroz ​​CNG वर कोणतीही ऑफर देणे कंपनीने टाळले आहे. या मॉडेलच्या XE आणि XE+ व्यतिरिक्त इतर पेट्रोल व्हेरियंटवर २५,००० रुपयांपर्यंत एकूण सूट दिली जात आहे. तसेच XE आणि XE+ ट्रिम्सवर एकूण १० हजार रुपयांची सवलत मिळते. डिझेलच्या सर्व मॉडेल्सवर ३०,००० रुपयांचा डिस्काउंट मिळतो.

आणखी वाचा – होंडाने लॉन्च केली स्मार्ट- Key फिचर असलेली ‘ही’ स्कूटर; टॉप व्हेरिएंटचे बुकिंग सुरू, किंमत आहे फक्त…

Tata Harrier and Safari

टाटा हॅरियर आणि सफारी SUV कार्सवर ३५ हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. यामध्ये २५,००० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश होतो.

(टीप – Tata Punch आणि Tata Nexon SUV यांवर कोणत्याही प्रकारची सवलत नसल्याची माहिती समोर आली आहे. या दोन कार्संना ग्राहकांचा सर्वाधिक पसंती मिळत असून त्यांचा विक्रीदरही सर्वात जास्त आहे.)