Tata Tiago EV Delivery: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि यामध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. टाटा मोटर्सकडे नेक्सॉन, टिगोर आणि टियागो सारख्या अनेक इलेक्ट्रिक कार आहेत. गेल्या वर्षी टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लाँच केली होती, जी ग्राहकांना खूप आवडते. लाँच झाल्यापासून चार महिन्यांत, इलेक्ट्रिक हॅचबॅकच्या १०,००० गाड्या वितरित केल्या गेल्या आहेत. कंपनीने दावा केला आहे की लाँच झाल्यानंतर चार महिन्यांत ही कामगिरी करणारी ही सर्वात वेगवान ईव्ही बनली आहे. पहिल्या २४ तासात १०,००० बुकिंग झाले आणि डिसेंबर २०२२ पर्यंत २०,००० बुकिंग झाले. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत ८.६९ लाख रुपयांपासून सुरू होते.

बॅटरी पॅक आणि रेंज

टाटा टियागो ईव्ही  XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux या चार ट्रिममध्ये येते. कारला बॅटरी पॅक आणि चार्जिंग ऑप्शनच्या आधारावर विभागले गेले आहेत. यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन १९.२kWh आणि २४kWh आहेत. १९.२ kWh ची बॅटरी फूल चार्ज केल्यावर २५० किमी पर्यंतची रेंज देते, तर मोठा बॅटरी पॅक फूल चार्ज केल्यावर ३१५ किमी पर्यंत रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी

(हे ही वाचा : BMW Full Form: ‘BMW’ चा फुलफॉर्म काय तुम्हाला माहितेय का? जाणून आश्चर्यचकित व्हाल! )

चार्जिंग वेळ

Tiago EV मध्ये चार चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. ७.२ किलोवॅट चार्जरने ३.६ तासांत पूर्ण चार्ज करता येईल. हे १५A पोर्टेबल चार्जरसह ८.७ तासांमध्ये १० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. दुसरीकडे, डीसी फास्ट चार्जरद्वारे ते केवळ ५८ मिनिटांत १० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकते.

Tata Tiago EV मध्ये ग्राहकांना बरीच वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यात पूर्णपणे स्वयंचलित हवामान नियंत्रण, प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रूझ कंट्रोल, ऑटो फोल्डसह इलेक्ट्रिक ORVM, ऑटो हेडलॅम्प आणि रेन सेन्सिंग वायपर यांचा समावेश आहे.