Tata Motors ही देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटा नेक्सॉन या गाडीची तुफान विक्री सध्या देशामध्ये होताना दिसत आहे. आता टाटा मोटर्सने नेक्सॉनचे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केले आहे. ज्यामध्ये कंपनीने काही अतिरिक्त फीचर्स दिले आहेत. कंपनीने नेक्सॉनचे Nexon EV Max XZ+ मॉडेल लॉन्च केले आहे. हा प्रकार आता Nexon EV Max लाइन-अपचा टॉप-स्पेक प्रकार आहे. या गाडीची किंमत काय आहे तसेच यामध्ये कोणकोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत हे जाणून घेऊयात.
अपडेटेड मॉडेलमध्ये काय असणार नवीन ?
Tata Nexon EV Max च्या नवीन टॉप-ऑफ-द-लाइन XZ+ लक्स या अपडेटेड व्हेरिएंटमध्ये नवीन युजर इंटरफेससह १०.२५ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हीटी सपोर्ट यामध्ये मिळणार आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अपडेटेड एचडी रिअर कॅमेरा व्ह्यू, १८०+ व्हॉइस कमांडसह सहा भाषांमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि अनेक फीचर्स मिळतात. या अपडेटेड मॉडेलचे बुकिंग सुरू करण्यात आली असून लवकरच याची डिलिव्हरी मिळण्यास सुरूवात होणार आहे.





बॅटरीची रेंज आणि परफॉर्मन्स
Tata Nexon EV Prime मॉडेलमध्ये ३०.२ Kwh ची लिथियम आयन बॅटरी मिळते. तथापि Nexon EV Max मध्ये ४०.४ kWh चे बॅटरी युनिट मिळते. ते १२७ बीएचपी पॉवर आणि २४५ एनएम टॉर्क जनरेट करते. nexon ईव्ही प्राईम एकदा चार्ज केली की ३१२ किमी धावते. तर मॅक्स व्हर्जन एका चार्जिंगमध्ये ४५३ किमी धावते.
Tata Nexon EV Max XZ+ Lux ची किंमत

टाटा मोटर्सने हे अपडेटेड मॉडेल १८.७९ लाख (एक्स शोरूम) रुपयांमध्ये बाजारामध्ये लॉन्च केली आहे. Tata Nexon EV Prime ची किंमत १४.४९ लाख ते १७.१९ लाख रुपये आहे. तर Nexon EV Max ची एक्स शोरूम किंमत १६.४९ लाख ते १९. ५४ लाच रुपये आहे. Nexon EV ची स्पर्धा महिंद्रा XUV400, MG ZS EV, Hyundai Kona Electric या इलेक्ट्रिक एसयूव्हीशी होते.