scorecardresearch

टाटा मोटर्सकडून ई-कार्गो ट्रान्सपोर्ट सोल्‍यूशन्‍ससह नवी एस ईव्‍ही लाँच

भारतातील सर्वात प्रगत, शून्‍य-उत्‍सर्जन, चारचाकी स्‍मॉल कमर्शियल वेईकल नवीन एस ईव्‍ही हरित व स्‍मार्ट परिवहन सोल्‍यूशन आहे, जे विविध आंतर-शहरीय उपयोजनांना सेवा देण्‍यास सज्‍ज आहे.

Tata Motoers e-cargo transport solutions
फोटो: PR

Tata Motors launches Ace EV: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज भारतातील १७ वर्षांनंतर अत्‍यंत लोकप्रिय एसचे इलेक्ट्रिक व्‍हर्जन – नवीन, क्रांतिकारी एस ईव्‍हीच्‍या लाँचसह स्थिर गतीशीलतेला चालना देण्‍याप्रती त्‍यांच्‍या मोहिमेमध्‍ये लक्षणीय झेप घेतली. भारतातील सर्वात प्रगत, शून्‍य-उत्‍सर्जन, चारचाकी स्‍मॉल कमर्शियल वेईकल नवीन एस ईव्‍ही हरित व स्‍मार्ट परिवहन सोल्‍यूशन आहे, जे विविध आंतर-शहरीय उपयोजनांना सेवा देण्‍यास सज्‍ज आहे.

एस ईव्‍ही लाँच करत टाटा सन्‍स आणि टाटा मोटर्सचे अध्‍यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्‍हणाले, ”ई-मोबिलिटी ही एक संकल्‍पना आहे, जिची वेळ आता आली आहे. टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही पॅसेंजर कार्स, व्‍यावसायिक वाहने व जग्‍वार लँड रोव्‍हरमध्‍ये या परिवर्तनाचे नेतृत्‍व करण्‍यासाठी जलदगतीने व विस्तार साधत पुढे जात आहोत. मला आज आनंद होत आहे की, एस ईव्‍हीच्‍या लाँचसह आम्‍ही ई-कार्गो मोबिलिटीच्‍या नवीन युगामध्‍ये प्रवेश करत आहोत. टाटा एस ही भारतातील आतापर्यंतची सर्वात यशस्‍वी कमर्शियल वेईकल आहे. या वेईकलने परिवहनामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे आणि वर्षानुवर्षे लाखो यशस्‍वी उद्योजकांना पाठबळ दिले आहे. ही वेईकल तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत, शुद्ध व स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन देत या वारसाला अधिक दृढ करेल. मी कमर्शियल वेईकल्‍सच्‍या इलेक्ट्रिफिकेशनबाबत उत्‍सुक आहे.”

युजर्सचा सहयोग आणि परिश्रमपूर्वक तयार केलेल्‍या परिसंस्‍थेच्‍या पाठिंब्‍यासह सह-विकसित केलेली नवीन एस ईव्‍ही ई-कार्गो मोबिलिटीसाठी सर्वांगीण सोल्‍यूशन देते. वेळेवर किफायतशीर व कार्यक्षम शेवटच्‍या अंतरापर्यंत डिलिव्‍हरींच्‍या मुलभूत गरजेची पूर्तता करते.टाटा मोटर्सने आघाडीच्‍या ई-कॉमर्स कंपन्‍या व लॉजिस्टिक्‍स सेवा प्रदाते – अॅमेझॉन, बिगबास्‍केट, सिटी लिंक, डॉट, फ्लिपकार्ट, लेट्स ट्रान्‍सपोर्ट, मूव्हिंग आणि यलो ईव्‍ही यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केल्‍याची देखील घोषणा केली. यामध्‍ये एस ईव्‍हीच्‍या ३९,००० युनिट्सची डिलिव्‍हरी, अधिकतम फ्लीट अपटाइमसाठी समर्पि‍त इलेक्ट्रिक वेईकल सपोर्ट सेंटर्सची उभारणी, नेक्‍स्‍ट-जनरेशन सानुकूल फ्लीट मॅनेजमेंट सोल्‍यूशन – टाटा फ्लीट एजची उभारणी आणि संबंधित टाटा ग्रुप कंपनीजची प्रमाणित सक्षम परिसंस्‍था टाटा युनिईव्‍हीर्सचा पाठिंबा यांचा समावेश आहे.

पॉवरट्रेन असलेले पहिले उत्‍पादन

एस ईव्‍ही हे टाटा मोटर्सचे ईव्‍होजेन पॉवरट्रेन असलेले पहिले उत्‍पादन आहे, जे अद्वितीय प्रमाणित १५४ किलोमीटर्सची रेंज देते. या वेईकलमध्‍ये सुरक्षित, सर्व वातावरणामध्‍ये अनुकूल कार्यसंचालनासह ड्रायव्हिंग रेंज वाढवण्‍यासाठी प्रगत बॅटरी कूलिंग सिस्टिम व रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग सिस्टिम आहे. तसेच या वेईकलमध्‍ये उच्‍च अपटाइमसाठी नियमित व जलद चार्जिंग क्षमता आहेत. या वेईकलमध्‍ये २७ केडब्‍ल्‍यू (३६ एचपी) मोटरसह १३० एनएम सर्वोच्‍च टॉर्कची शक्‍ती आहे, ज्‍यामधून २०८ फूट३ चे सर्वोच्‍च कार्गो आकारमान आणि २२ टक्‍के ग्रेड-एबिलिटीची खात्री मिळते. ज्‍यामुळे अधिक भार असताना देखील वेईकल सुलभपणे ड्राइव्‍ह करता येते. एस ईव्‍हीचे कंटेनर वजनाने हलके व टिकाऊ साहित्‍यापासून बनवण्‍यात आले आहे, जे ई-कॉमर्स लॉजिस्टिक्‍सच्‍या आवश्‍यकतांसाठी परिपूर्ण आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata motors launches e cargo transport solutions with ace ev ttg

ताज्या बातम्या